४५ वर्षांनंतर देसाई कुटुंबाचा सदस्य जिल्हा बँकेत, शंभूराज देसाईंचा दणदणीत विजय, मोठ्या मताधिक्याने मारली बाजी

पाटणमधून दोन सदस्य जाणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
DCC Bank election result, shambhuraje Desai win, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे )
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे तब्बल ४५ वर्षांनंतर देसाई कुटुंबातील सदस्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, हा विजय काठावरचा नसून चांगल्या मताधिक्याने मिळाल्याने देसाई समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पाटणच्या राजकारणात देसाई आणि पाटणकर यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पाहायला मिळाला. या लढतीत शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांच्यावर मात करत जिल्हा बँकेत प्रवेश निश्चित केला. मागील निवडणुकीतील पराभवानंतर यावेळी त्यांनी विजय मिळवत आपले समर्थक आणि कार्यकर्त्यांना आनंदाची बातमी दिली.

 तब्बल साडेचार दशकांनंतर देसाई कुटुंबातील सदस्य जिल्हा बँकेत मानाने प्रवेश करणार असल्याने हा विजय समर्थकांसाठी भावनिक आणि प्रतिष्ठेचा ठरला आहे.

निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाला या निकालाने नवे वळण मिळाले असून पाटणच्या राजकीय वर्तुळात या विजयाची चर्चा रंगली आहे.
       -----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !