पारनेर सोसायटी मतदारसंघातून २४ मतांनी मात
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (सुदाम दरेकर)
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पारनेर सोसायटी मतदारसंघातून खासदार निलेश लंके यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत खासदार निलेश लंके यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार राहुल शिंदे पाटील यांचा २४ मतांच्या फरकाने पराभव करत जिल्हा बँकेवर आपले वर्चस्व सिद्ध केले.
या निवडणुकीसाठी पारनेर तालुक्यातून एकूण १०४ मतदार पात्र होते. पारनेर तालुक्यातील सहकार क्षेत्रातील सत्ता कोणाकडे जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मतमोजणीअंती खासदार निलेश लंके यांना ६३ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी राहुल शिंदे पाटील यांना ४१ मतांवर समाधान मानावे लागले.
विजयाची बातमी समजताच खासदार निलेश लंके यांच्या समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी पारनेर तालुक्यात एकच जल्लोष केला. "हा विजय पारनेर तालुक्यातील मतदार, सभासद आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासाचा आहे," अशी भावना यावेळी विजयी उमेदवार खासदार निलेश लंके यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात आली.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











