वाईत जुन्या वादातून सलूनमध्ये भीषण राडा, मध्यस्थी करणाऱ्या वडिलांच्या कपाळावर लोखंडी हत्याराने वार, दोघांवर गुन्हा दाखल

सहा महिन्यांपूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून तरुणाला मारहाण, वाई शहरातील मुख्य बाजारपेठेतील घटनेने खळबळ
Stab with an iron weapon, two arrested, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
वाई - सहा महिन्यांपूर्वी झालेल्या क्षुल्लक वादाचा राग मनात धरून दोघांनी एका तरुणाला फोन करून बोलावून घेत मारामारी केल्याची धक्कादायक घटना वाई शहरातील मुख्य बाजारपेठेत घडली. ही भांडणे सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाच्या वडिलांच्या कपाळावर लोखंडी हत्याराने गंभीर वार करण्यात आले. मंगळवारी (दि. ६) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये काही काळ तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

याप्रकरणी पीडित तरुण ओंकार सुनील तावरे (वय २६, व्यवसाय-सलून, रा. रविवार पेठ, वाई) यांनी वाई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार संशयित आरोपी जुनेद शेख (रा. फुलेनगर, वाई) आणि विजय अंकुशी (रा. बाबा पेट्रोल पंपासमोर, बावधन नाका, वाई) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय घडली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार तावरे यांचे वाईच्या मुख्य बाजारपेठेतील हरिहरेश्वर बँकेच्या खालील तळमजल्यावर ‘राजकलम’ नावाचे सलून आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून ओंकार आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. त्याच वादाची कुंप घालून बसलेल्या जुनेद शेख आणि विजय अंकुशी यांनी मंगळवारी सायंकाळी ओंकार यांना फोन करून बाहेर बोलावून घेतले. ओंकार घटनास्थळी पोहोचताच विजय अंकुशी याने त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. पाठोपाठ जुनेद शेख यानेही ओंकार यांना हाताने बेदम मारहाण केली.

वडिलांवर लोखंडी हत्याराने हल्ला
सलूनमध्ये सुरू असलेल्या या आरडाओरड आणि भांडणाचा आवाज ऐकून ओंकार यांचे वडील सुनील वसंत तावरे हे तातडीने मध्यस्थी करण्यासाठी घटनास्थळी धावून आले. ते भांडण सोडवत असतानाच आरोपी विजय अंकुशी याच्या हातातील लोखंडी हत्याराचा जोरदार वार सुनील तावरे यांच्या कपाळावर बसला. या हल्ल्यात त्यांच्या दोन्ही भुवयांच्या वरील भागाला गंभीर दुखापत झाली व ते रक्ताच्या थारोळ्यात पडले.
घटनेची माहिती मिळताच वाई पोलीस ठाण्याच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे मुख्य बाजारपेठेत घबराटीचे वातावरण पसरले होते. वाई पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून संशयितांचा शोध व पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !