अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात ३ ठिकाणी महत्त्वाच्या बैठका

राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने, प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत यांची प्रमुख उपस्थिती, सदस्य नोंदणी अभियानाचा होणार शुभारंभ
Important meetings of the Editors' and Journalists' Association, sangola, mangalwedha, pandharpur, solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (मनिषा कुलकर्णी)
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, ध्येय-धोरणांची आखणी करणे आणि पुढील कार्याची दिशा ठरवण्यासाठी रविवार, २४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्यात तीन ठिकाणी महत्त्वपूर्ण बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. राजा माने साहेब आणि प्रदेशाध्यक्ष मा. सतीश भाऊ सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठका पार पडणार आहेत.
या बैठकांमध्ये जिल्ह्यातील पत्रकार, सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संघाच्या विशेष सदस्य नोंदणी अभियानाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या सर्व बैठकांना राष्ट्रीय अध्यक्ष मा. राजा माने व प्रदेशाध्यक्ष मा. सतीश भाऊ सावंत यांच्यासोबत राज्य तांत्रिक सल्लागार नागनाथ सुतार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण नागणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

बैठकांचे ठिकाण व वेळ खालीलप्रमाणे:
पंढरपूर बैठक:
वेळ: सकाळी ९:३० वाजता
ठिकाण: शासकीय विश्रामगृह, पंढरपूर

मंगळवेढा बैठक:
वेळ: सकाळी ११:०० वाजता
ठिकाण: नवीन शासकीय विश्रामगृह, मंगळवेढा

सांगोला बैठक:
वेळ: दुपारी १२:३० वाजता
ठिकाण: प्रदेशाध्यक्ष मा. सतीश भाऊ सावंत यांचे कार्यालय, 
(गाळा क्र. २१, पहिला मजला, तहसील कार्यालयासमोर), सांगोला

उपस्थित राहण्याचे आवाहन
पत्रकारांचे प्रश्न, त्यांचे हक्क आणि संघटनेचा विस्तार यावर या बैठकांमध्ये सविस्तर चर्चा होणार आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार, संघ सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्याला सोयीच्या ठरेल त्या ठिकाणच्या बैठकीस वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन सोलापूर जिल्हा अध्यक्ष सचिन कुलकर्णी (मो. ९०९६२५१२११) यांनी केले आहे.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !