हनुमान विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, शिंदेवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा!
शिवशाही वृत्तसेवा , माळशिरस (राहुल तनपुरे)
नातेपुते - रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील कर्मवीर विद्या प्रबोधनीच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘शब्दगंध २०२६’ या पुस्तकासाठी हनुमान विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, शिंदेवाडी येथील विद्यार्थिनी कु. भक्ती दीपक घाडगे हिने साकारलेल्या चित्राची निवड झाली आहे. तिच्या या कलात्मक यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
चित्रकलेच्या माध्यमातून आपल्या कल्पकतेला, सर्जनशीलतेला आणि कलागुणांना प्रभावीपणे अभिव्यक्त करणाऱ्या भक्तीने आपल्या कलेच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे. तिच्या चित्राची ‘शब्दगंध २०२६’ या पुस्तकासाठी निवड होणे ही तिच्या कलागुणांची पोचपावती असून विद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे.
विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळाल्यास ते निश्चितच यशाची नवी शिखरे गाठू शकतात, याचे भक्ती घाडगे हिचे यश हे उत्तम उदाहरण आहे. तिच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही आपल्या कलागुणांना विकसित करण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल कु. भक्ती दीपक घाडगे हिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून तिच्या पुढील कलात्मक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत. तिने आपल्या कलेच्या माध्यमातून यापुढेही विद्यालयाचा नावलौकिक वाढवावा आणि यशाची नवनवी शिखरे गाठावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
भक्तीच्या या यशाबद्दल तिचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











