उपक्रमशील शिक्षक कृष्णा कांबळे यांचे बहुआयामी कार्य - शिक्षक दिन विशेष

अनेक विधायक उपक्रमात सहभाग 
Teachers day special, krishna kambale, Maharashtra, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे) 
श्री नरसिंह हायस्कूल, धोम (ता. वाई, जि. सातारा) येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेले  कृष्णा बंडू कांबळे (एम.ए., एम.एड. इंग्रजी) यांनी २४ वर्षांच्या शैक्षणिक सेवेत सामाजिक, पर्यावरणीय, साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.

बालगंगा विद्या मंदिर, चुनाभट्टी-जिते (ता. पेण, जि. रायगड) येथे त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीची सुरुवात झाली. येथे त्यांनी कापडी पिशव्यांचा वापर, प्लास्टिकमुक्त विद्यालय, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन व डोंगर परिसरात बीजारोपण असे उपक्रम राबविले. विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या बियांच्या माध्यमातून ओसाड डोंगरावर हरित वैभव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच विद्यार्थी व पालकांच्या सहकार्याने कोल्हापूर पद्धतीचे बंधारे उभारून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना राबविण्यात आली. या पर्यावरणीय कार्याची दखल घेत तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांनी त्यांचा उपक्रमशील शिक्षक म्हणून सत्कार केला, तर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सध्या श्री नरसिंह हायस्कूल, धोम येथे कार्यरत असताना गरजू विद्यार्थ्यांना मदत, ग्रामीण-शहरी संस्कृती कार्यशाळा, विविध स्पर्धा, आधुनिक शेतीविषयक कार्यशाळा तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांतून अनेक विद्यार्थी राज्यस्तरावर यश मिळवत आहेत.

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जीवनकार्यावर त्यांनी ‘ज्ञानदीप’ हे पुस्तक प्रकाशित केले असून, महापुरुषांच्या जीवनकार्यावर आधारित ‘आपले महापुरुष’ हे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे. विविध वर्तमानपत्रे व दिवाळी अंकांत त्यांचे लेख व कविता प्रसिद्ध झाले आहेत. सामाजिक, पर्यावरणीय, साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल महाराष्ट्रासह कर्नाटक, आसाम व दिल्लीतील विविध संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरविले आहे. या कार्यासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची प्रेरणा तसेच संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक दत्तात्रय देसाई, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभल्याचे कृष्णा कांबळे यांनी सांगितले.

-----------------

Sudhakar pant paricharak, anniversary, shivshahi new, advertise,

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !