एकाच दिवसात १.५ कोटींचा संमिश्र व्यवसाय
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
२०२६ चा 'आदर्श पतसंस्था पुरस्कार' प्राप्त ज्ञानदीप को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा ४८ वा वर्धापन दिन संस्थेच्या पाचवड (ता. वाई) शाखेत विविध उपक्रमांसह अत्यंत उत्साहात पार पडला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून शाखेने २ सप्टेंबर रोजी तब्बल १.५ कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसाय नोंदवत नवा उच्चांक गाठला.
कार्यक्रमासाठी भुईज पोलीस ठाण्याच्या परिविक्षाधीन उपअधीक्षक (डीवायएसपी) पूनम झगडे आणि नामवंत उद्योजक व महाराष्ट्र केसरी पैलवान शिवाजीराव पाचपुते (आण्णा) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संस्थापक विश्वनाथ गोविंद पवार यांनी लावलेले हे सहकाराचे छोटे रोपटे आज वटवृक्ष झाले असून संस्थेचा एकूण व्यवसाय ७,६७५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. संस्थेच्या एकूण ११० शाखा असून एकट्या पाचवड शाखेचा व्यवसाय ८६ कोटींचा आहे. संस्थेत १,३०० दैनंदिन ठेव प्रतिनिधी आणि १,१०० कर्मचारी कार्यरत आहेत.
ज्ञानदीप पतसंस्था केवळ आर्थिक क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातही अग्रेसर आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल डीवायएसपी पूनम झगडे यांनी संचालक मंडळ, कर्मचारी आणि ठेव प्रतिनिधींचे मनापासून कौतुक केले.
कार्यक्रमाला कवठे येथील प्रगतशील शेतकरी रामचंद्र डेरे, जावळी पंचायत समितीचे माजी सभापती तानाजी शिर्के, भुईंजचे ग्रामपंचायत अधिकारी मल्हारी शेळके, आरोग्य विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी राजेंद्र राऊत आणि यशवंतराव चव्हाण पतसंस्था व्याजवाडीचे दिलीप पिसाळ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाचवड शाखेचे कार्यालय प्रमुख संदीप जगताप यांनी करून मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन अभिजीत जाधव यांनी केले, तर शौर्यशील शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला शाखेचे सर्व कर्मचारी व दैनंदिन ठेव प्रतिनिधी, सभासद व खातेदार बहुसंख्येने उपस्थित होते.
ग्राहकांचा विश्वास हीच आमची ताकदज्ञानदीप पतसंस्थेने नेहमीच पारदर्शक कारभार आणि तत्पर ग्राहकसेवेला प्राधान्य दिले आहे. ४८ वर्षांच्या या प्रदीर्घ प्रवासात संस्थेने ग्रामीण व शहरी भागातील घटकांना आर्थिक पाठबळ देत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. एकाच दिवसात झालेला १.५ कोटींचा हा व्यवसाय सभासदांनी संस्थेवर ठेवलेल्या दृढ विश्वासाचे प्रतीक आहे, असे मत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा





























