शिंदेवाडीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार, पोलीस, कुस्ती व सामाजिक क्षेत्रातून भावपूर्ण श्रद्धांजली
शिवशाही वृत्तसेवा, माळशिरस, (वैभव कुलकर्णी)
बारामती पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष व धडाडीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) तसेच माजी महाराष्ट्र चॅम्पियन पै. संजय (बापू) जगदाळे यांच्या धर्मपत्नी सौ. सुनिता संजय जगदाळे यांचे शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने जगदाळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून बारामतीसह माळशिरस परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
संजय (बापू) जगदाळे हे पोलीस सेवेसोबतच कुस्ती आणि सामाजिक क्षेत्राशी सातत्याने जोडलेले असून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा उत्स्फूर्त सहभाग राहिला आहे. त्यांच्या या सामाजिक व सेवाभावी वाटचालीत सौ. सुनिता जगदाळे यांनी खंबीरपणे साथ देत कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. मनमिळाऊ, शांत, प्रेमळ आणि आपुलकीच्या स्वभावामुळे त्या नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिचितांमध्ये विशेष जिव्हाळ्याच्या होत्या.
सौ. सुनिता जगदाळे यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी शिंदेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी, कुस्ती क्षेत्रातील नामवंत मल्ल, विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी जगदाळे परिवाराचे सांत्वन करत सौ. सुनिता जगदाळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
संजय (बापू) जगदाळे यांच्या सामाजिक कार्यात संपूर्ण जगदाळे कुटुंबाचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नीच्या निधनाची वार्ता समजताच पोलीस दलासह कुस्ती क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी दुःख व्यक्त केले.
सौ. सुनिता जगदाळे यांच्या पश्चात पती, मुलगा, मुली तसेच मोठा परिवार आहे.
दरम्यान, सावडण्याचा विधी सोमवार, दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता शिंदेवाडी येथे होणार आहे.
सौ. सुनिता जगदाळे यांच्या निधनाने जगदाळे परिवारावर आलेल्या दुःखात बारामती, माळशिरस परिसरातील नागरिक, पोलीस अधिकारी-कर्मचारी, मल्ल तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा





























