गणेशोत्सव काळात ध्वनिप्रदूषणाला आळा घाला - पोलीस उपअधीक्षक पुनम झगडे यांचे आवाहन

नियमांचे  उल्लंघन केल्यास पोलीस कडक कारवाई करणार 
“गणेशोत्सव उत्साहात साजरा करा; मात्र नियमांचे उल्लंघन करून इतरांना त्रास होईल, असे कोणतेही कृत्य करू नका. प्रशासनाला सहकार्य करा. डीजे, ध्वनिप्रदूषण, आक्षेपार्ह सोशल मीडिया संदेश किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या प्रकारांवर पोलिस प्रशासनाची करडी नजर राहणार असून, नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट संदेश भुईंज पोलिस प्रशासनाने दिला.
Avoid sound pollution, police guideline for Ganesh utsav, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (शुभम कोदे)
दरवर्षी साजरा होणारा गणेशोत्सव हा समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहेत. प्रत्येक नागरिकाला आपला धर्म, श्रद्धा आणि परंपरा पाळण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, हे स्वातंत्र्य इतर नागरिकांच्या आरोग्य, शांतता आणि सार्वभौम अधिकारावर अतिक्रमण करणारे असू शकत नाही. त्यामुळे  सण-उत्सव, मिरवणुका, धार्मिक स्थळे, तसेच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी कायद्याची समान, पारदर्शक आणि कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्ष व कार्यकर्ते यांनी घ्यावी असे आवाहन भुईंज पोलीस ठाण्याच्या  परिविक्षाधीन उपअधीक्षक  पूनम झगडे व सहाय्यक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी केले.
भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावांमधील सुमारे १७५ गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, कार्यकर्ते व पोलिस पाटील संघटना यांच्या संयुक्त बैठकीत  पूनम झगडे व पृथ्वीराज ताटे बोलत होते.
देशात ध्वनिप्रदूषण कायदा लागू असून, त्यानुसार निवासी क्षेत्र, शांतता क्षेत्रासाठीची दिवसरात्रीसाठीची आवाज मर्यादा ठरवण्यात आली आहे. नियमांनुसार ध्वनिवर्धक यंत्रणा वापरासाठीची परवानगी आवश्यक असून, रात्रीच्या वापराबाबतचे स्पष्ट नियम असल्याने मोठ्या आवाजात ध्वनिप्रक्षेपक करण्यास कोणतीही  मुभा नाही.

पर्यावरणपूरक व ध्वनिप्रदूषणमुक्त गणेशोत्सव  उपक्रमांतून उत्सव साजरे करण्याची संस्कृती अधिक संवेदनशील, विवेकी आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी जनजागृती केली पाहिजे .ध्वनिप्रदूषण हा देखील पर्यावरणीय आणि सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न आहे.
एखाद्या मंडळाकडून कडून नियमांचे उल्लंघन झाल्यास, आवाजाची मर्यादा वाढल्यास तत्काळ गुन्हा दाखल केला जाईल."
यावेळी पूनम झगडे यांनी आवाजाची  मर्यादा (डेसिबल) कशी मोजली जाते, याचे मंडळांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
बैठकीत विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर झगडे व ताटे यांनी बहुतांश.  मंडळे ही विसर्जन मिरवणुकीच्या जुन्या आणि नव्या मार्गात अडकल्यामुळे चांगले काही घडत नाही, असे चित्र निर्माण झाल्याचे दिसून येते. आपण सर्वांनी मिळून ते बदलायचा प्रयत्न करूया, असे म्हटले. ते म्हणाले, "गणपतीची विसर्जन मिरवणूक ही आदर्शवत करूया. अनंत चतुर्दशी दिवशी गोंधळ होऊ नये, यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. सर्व मंडळे मंडपातून उशिरा बाहेर पडतात. सर्वांनाच चौकात कार्यक्रम करायचा असतो. त्यामुळे खूप वेळ जातो आणि मिरवणूक पुढे सरकत नाही परंतु त्यास यावेळी शिस्त लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

गणेश मंडपांमध्ये सीसीटीव्हीची नजर
गणेश मंडपांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, सुरक्षित वीज व्यवस्था करणे आणि संशयास्पद व्यक्ती अथवा वस्तू आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. 
गणेशोत्सव हा श्रद्धेचा आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. त्यामुळे उत्सव साजरा करताना कायदा-सुव्यवस्था, सामाजिक शांतता आणि नागरिकांची सुरक्षितता यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी केले.

-----------------

Sudhakar pant paricharak, anniversary, shivshahi new, advertise,

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------


Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !