पोलीस कॉन्स्टेबल किरण निंबाळकर जखमी भुईंज पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्याची नोंद
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
सुरूर (ता. वाई) येथे रात्रगस्तीदरम्यान संशयास्पद दुचाकी अडवून चौकशी करत असताना पोलिसांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात भुईंज पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल किरण निंबाळकर हे जखमी झाले असून, याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणणे आणि खुनाचा प्रयत्न व दुखापत केल्याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरूर येथील बाजार तळावर काही लोक थांबल्याची आणि फलटण येथील काही व्यक्ती मारण्यासाठी येणार असल्याची माहिती रात्रगस्ती पथकाला मिळाली होती. माहितीनुसार पोलीस पथक पारधी वस्ती, सुरूरकडे जात असताना समोरून एक क्रमांक नसलेली संशयास्पद दुचाकी आली. पोलिसांनी सदर दुचाकी थांबवून चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता, दुचाकीवरील व्यक्तींनी शासकीय कर्तव्यात अडथळा आणत पोलीस कॉन्स्टेबल किरण निंबाळकर यांच्यावर हत्याराने वार केले आणि दुचाकीवरून कच्च्या रस्त्याने पोबारा केला. या हल्ल्यात पोलीस कॉन्स्टेबल किरण निंबाळकर यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे.
सदर घटनेची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखा आणि भुईंज पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने तातडीने कारवाई करत या प्रकरणातील एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. तसेच, पळून गेलेल्या इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक कसून तपास करत आहे.
-----------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



























