ज्येष्ठ महिलेची ४.८० लाखांची फसवणूक
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई शहरात भरदिवसा ज्येष्ठ महिलेचा विश्वास संपादन करून तिच्या पर्समधील तब्बल ४ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना ६ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा विलास सोनपटकी (वय ६८, रा. गंगापुरी, वाई) यांना एका कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याच्या बहाण्याने एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर दुचाकीवरून आलेल्या या व्यक्तीने सोन्याचे दागिने पाहण्याच्या बहाण्याने त्यांचा विश्वास संपादन केला.
संबंधित व्यक्तीने सोन्याच्या बांगड्या व पाटल्या पाहण्यास मागितल्या. त्यानंतर महिलेच्या पर्समधील दागिने घेऊन त्याने हातचलाखीने ते लंपास केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. काही वेळाने संबंधित व्यक्ती दुचाकीवरून घटनास्थळावरून निघून गेल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
फसवणुकीनंतर महिलेने पर्स तपासली असता त्यातील सोन्याचे दागिने गायब असल्याचे निदर्शनास आले. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये ४० ग्रॅम वजनाच्या प्रत्येकी २० ग्रॅमच्या दोन सोन्याच्या पाटल्या आणि प्रत्येकी १० ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या बांगड्या, असा एकूण ८० ग्रॅम सोन्याचा ऐवज असल्याचे तक्रारीमध्ये नमूद आहे. या दागिन्यांची एकूण किंमत ४ लाख ८० हजार रुपये असल्याचे पोलिस नोंदीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अमित भारत सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक यांच्याकडे तपास सोपविण्यात आला असून, संशयिताचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा


























