शिवशाही न्यूज बातमीचा दणका - भैरवगड पुनर्वसनाचा प्रश्न निर्णायक टप्प्यावर

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक तर बुधवारी मंत्रालयात मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

Bhairavgad landslide rehabilitation, minister makrand Patil, collector, Satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

मौजे भैरवगड (टोळेवाडी) येथील भूस्खलनग्रस्त ग्रामस्थांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्नावर शिवशाही न्यूजने बातम्यांचा धडाका लावल्यानंतर आता हा प्रश्न निर्णायक टप्प्यावर आला आहे. पुनर्वसनासाठी प्रशासनाकडून हालचालींना वेग आला असून, सोमवार, दि. १० ऑगस्ट रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलवण्यात आली आहे, तर त्यानंतर बुधवार, दि. १२ ऑगस्ट रोजी मंत्रालय, मुंबई येथे मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने मदत व पुनर्मवसन मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.

भैरवगड ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याच पार्श्वभूमीवर उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांची आमदार मनोज घोरपडे यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रश्नांची माहिती घेतली. त्यानंतर प्रशासकीय पातळीवरही हालचाली सुरू झाल्या असून आता दोन महत्त्वाच्या बैठका होणार असल्याने ग्रामस्थांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथून दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी काढण्यात आलेल्या पत्रानुसार सोमवार, दि. १० ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोरील मीटिंग हॉलमध्ये आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

ही बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार मनोज घोरपडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. भैरवगड (टोळेवाडी) येथे झालेल्या भूस्खलनामुळे गावाचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा तसेच इतर मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी सातारा, तहसीलदार सातारा, गटविकास अधिकारी पंचायत समिती सातारा, पुनर्विकास संस्था टोळेवाडी (भैरवगड)चे अध्यक्ष/सचिव तसेच भैरवगड पुनर्वसन समिती-२चे अध्यक्ष/सचिव यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बुधवारी मंत्रालयात मोठी बैठक

दरम्यान, यापेक्षाही महत्त्वाची बैठक बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता मंत्रालय, मुंबई येथे होणार आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद  पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

मदत व पुनर्वसन विभागाच्या पत्रानुसार या बैठकीत भूस्खलन तसेच दरडप्रवण गावांचे पुनर्वसन व नागरी सुविधा पुरविण्याबाबतच्या सुधारित धोरणासंदर्भात चर्चा, तसेच मौजे भैरवगड, ता. जि. सातारा येथील भूस्खलनग्रस्तांचे सासपडे येथे पुनर्वसन करण्यासाठी जागा किंवा अन्य पर्यायांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे.

याशिवाय कराड उत्तर मतदारसंघातील पूरपरिस्थितीनुसार पुनर्वसित गावांना नागरी कायदा सुविधा मिळण्याबाबत आणि मौजे पाटण गावाच्या पुनर्वसनासंदर्भातील मुद्द्यांवरही बैठकीत चर्चा होणार आहे.

मंत्रालयातील बैठकीला दिग्गजांची उपस्थिती

या बैठकीस बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री अदिती तटकरे, मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यासह, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, आमदार सुनील शंकरराव शेळके, आमदार शरद सोनावणे, आमदार रोहिदास निकम, आमदार बाबाजी काळे, आमदार शंकर मांडेकऱ यांची उपस्थिती अपेक्षित आहे.

तसेच मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव, विभागीय आयुक्त, संबंधित जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी आणि इतर संबंधित अधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

          -----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

-----------------

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------


Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !