धर्मपुरी ते शिंदेवाडी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ग्रामस्थांचे साकडे

ॲड. राहुल वाघमोडे पाटील यांच्या मागणीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक; तातडीने कार्यवाहीचे आश्वासन

The deplorable condition of the road, Solapur, malshiras, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, माळशिरस (प्रतिनिधी वैभव कुलकर्णी)

माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी ते शिंदेवाडी (गणेश मंदिर ते शिंदेवाडी) दरम्यानच्या अत्यंत खराब आणि जीवघेण्या बनलेल्या रस्त्याबाबत ग्रामस्थांच्या वतीने अनेक वेळा  यापूर्वी आवाज उठवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आज माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांचे (PSO) ॲड. राहुल (दादा) वाघमोडे-पाटील यांनी शिंदेवाडी येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी युवा वर्ग व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

रस्त्याची दुरवस्था आणि एसटी बस सेवेबाबत गंभीर प्रश्नावर चर्चा झाली.

सदिच्छा भेटीदरम्यान ग्रामस्थांनी धर्मपुरी-शिंदेवाडी अपूर्ण अवस्थेतील रस्त्या संदर्भात व गणेश मंदिर ते शिंदेवाडी रस्त्याच्या बिकट परिस्थितीकडे आणि त्यामुळे होत असलेल्या त्रासाकडे ॲड. राहुल वाघमोडे पाटील यांचे लक्ष वेधले. या मार्गावरील खड्ड्यांमुळे शालेय विद्यार्थी, महिला, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास व अपघातांचा धोका, गावातील व्यवसायिक व उद्योजक यांना नाहक त्रासाची तीव्रता त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या. धर्मपुरी ते शिंदेवाडी रस्त्याचे उर्वरित लेअर व

गणेश मंदिर - शिंदेवाडी खड्डेमय झालेल्या कामाचे तातडीने मार्गी लावण्याचे कडक निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले. पावसाळ्याची वाट न बघता किंवा इतर तांत्रिक कारणे पुढे करून रखडलेले हे काम प्राधान्याने प्रशासनाकडून पूर्ण करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून लवकर पूर्ण करण्याबाबतचा शब्द त्यांनी यावेळी दिला.

तसेच, बारामती-शिंदेवाडी एसटी बस सेवा बंद असल्यामुळे

विद्यार्थी ,कर्मचारी व नागरिक यांचे होत असलेले हाल हा कळीचा मुद्दाही या चर्चेत प्रकर्षाने समोर आला. यावेळी अनेक सामाजिक कामाच्या संदर्भात पूर्ण करण्यासाठी योग्य ती मदत करण्याची तयारी दाखवली.

उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल आणि या संदर्भातील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी योग्य ती मदत केली जाईल, असा विश्वास यावेळी देण्यात आला. या सकारात्मक भूमिकेमुळे हा प्रश्न लवकरच सुटणार असल्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

या प्रसंगी जितेंद्र (बाळू काका) रणवरे, विरेंद्र शिंदे, छगन रूपनवर, अमित घाडगे, मदन रणवरे, ज्ञानेश्वर जगदाळे, राहुल तनपुरे, डी. जी. रणवरे, विक्रम भगत यांच्यासह परिसरातील मान्यवर, ग्रामस्थ आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

       -----------------

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !