दिव्यांगांच्या मदतीसाठी ‘संघर्ष’ संस्थेचा सातत्यपूर्ण पुढाकार

संस्थेच्या या सामाजिक बांधिलकीमुळे अनेक दिव्यांग बांधवांना आधार मिळतो 

Assistance for persons with disabilities, Sangharsh' organization, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटना, सातारा जिल्हा ही संस्था दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने कार्यरत असून, त्यांच्या दैनंदिन जीवनातील गरजा लक्षात घेऊन विविध प्रकारचे सहाय्य उपलब्ध करून देत आहे. दिव्यांगांना आवश्यक साहित्य, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठविण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. संस्थेच्या या सामाजिक बांधिलकीमुळे अनेक दिव्यांग बांधवांना आधार मिळत आहे.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने वाई शहर व तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. वाई तहसील कार्यालय येथे झालेल्या या कार्यक्रमात व्हीलचेअर, चालण्याच्या कुबड्या, वॉकर, श्रवणयंत्र आदी साहित्याचे वाटप करण्यात आले.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक  गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास तहसीलदार सोनाली मिटकरी, पंचायत समिती सदस्य तथा संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक स्वप्निल  गायकवाड, नगराध्यक्ष अनिल सावंत, पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, संस्थेचे सातारा जिल्हाध्यक्ष बाजीगर भाई इनामदार, संचालक डॉ. शेखर कांबळे, संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक बापू गायकवाड म्हणाले, “संस्थेचे जिल्हाध्यक्ष बाजीगर भाई इनामदार यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील संपूर्ण दिव्यांग बांधवांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्न करीत आहे. भविष्यात जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांगापर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. संस्थेचे कार्य संपूर्ण राज्यात पोहोचवून महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांगाच्या मदतीसाठी संघर्ष उभा राहील आणि एक दिवस संपूर्ण राज्यात संस्थेचे नाव आदराने घेतले जाईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे विधानसभा अध्यक्ष सूर्यकांत भोसले यांनी केले. जिल्हाध्यक्ष बाजीगर भाई इनामदार यांनी संस्थेच्या वर्षभरातील सामाजिक कार्याचा आढावा मांडत संस्थेच्या कार्याची माहिती दिली. तहसीलदार सोनाली मिटकरी यांनी तालुक्यातील प्रत्येक दिव्यांगासाठी प्रशासन कार्यबद्ध व कटिबद्ध राहील, अशी ग्वाही दिली. नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करून आगामी काळात नगरपरिषद व वैयक्तिक स्तरावर आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यानंतर मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष बाजीगर भाई इनामदार यांनी आभार मानले.

"दिव्यांग बांधव हे सहानुभूतीचे नव्हे, तर संधीचे हकदार आहेत. समाजात त्यांना समान संधी आणि सन्मानाचे स्थान मिळवून देणे हेच आमच्या संस्थेचे मुख्य ध्येय आहे," असे विचार ‘संघर्ष’ संस्थेच्या अध्यक्षांनी  कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले.

        -----------------

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------


Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !