'रोटरी अचिव्हर्स अवॉर्ड्स २०२५-२६' मध्ये पंढरपूर रोटरीची नेत्रदीपक कामगिरी; अध्यक्ष डॉ. वैभव सादिगले व सचिव मयूर परिचारक यांचा विशेष सन्मान
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर प्रतिनिधी
रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या वतीने लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या 'रोटरी अचिव्हर्स अवॉर्ड्स २०२५-२६' सोहळ्यात रोटरी क्लब ऑफ पंढरपूरने आपल्या उत्कृष्ट समाजोपयोगी कामगिरीच्या जोरावर तब्बल ११ पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. रोटरी सदस्यांचे संघटन आणि वर्षभरातील एकसंध प्रयत्नांमुळे पंढरपूर रोटरीने संपूर्ण डिस्ट्रीक्ट ३१३२ मध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
अध्यक्ष डॉ. वैभव सादिगले, सचिव मयूर परिचारक आणि असिस्टंट गव्हर्नर डॉ. कैलास करांडे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली क्लबने आरोग्य, शिक्षण आणि डिजिटल क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. या सर्वंकष कामगिरीची दखल घेत डिस्ट्रीक्ट ३१३२ कडून पंढरपूर रोटरीला विविध श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले.
मिळालेल्या पुरस्कारांची सविस्तर यादी:
प्रथम क्रमांक: सर्वोत्कृष्ट फोरम (Best Forum)
द्वितीय क्रमांक:सर्वोत्कृष्ट वैद्यकीय उपक्रम (Best Medical Projects)
तृतीय क्रमांक:
सर्वोत्कृष्ट संचलीत क्लब (Best Administered Club)
सर्वोत्कृष्ट साक्षरता उपक्रम (Best Literacy Projects)
सर्वोत्कृष्ट असिस्टंट गव्हर्नर: डॉ. कैलास करांडे
चतुर्थ क्रमांक:
सर्वोत्कृष्ट क्लब (Best Club)
सर्वोत्कृष्ट तंत्रस्नेही क्लब (Best Technosavvy Club)
विशेष वैयक्तिक सन्मान:
उत्कृष्ट अध्यक्ष (Outstanding President): डॉ. वैभव सादिगले
उत्कृष्ट सचिव (Outstanding Secretary): मयूर परिचारक
आंतरराष्ट्रीय व डिस्ट्रीक्ट बहुमान: रोटरी इंटरनॅशनल व डिस्ट्रीक्ट टीमतर्फे २ विशेष सायटेशन्स (Citations)
समाजोपयोगी वैद्यकीय शिबिरे, साक्षरता अभियान, डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि सुरळीत प्रशासन या सर्वांचा सुयोग्य मेळ घालत पंढरपूर रोटरीने हे दैदिप्यमान यश संपादन केले आहे. हा विजय म्हणजे केवळ मिळालेल्या चषकांचा नसून पंढरपूरच्या रोटरी सदस्यांनी वर्षभरात केलेल्या एकत्रित समाजसेवेची आणि मेहनतीची पोचपावती असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या यशाबद्दल सर्व स्तरातून विजेत्यांचे आणि रोटरी क्लब ऑफ पंढरपूरचे कौतुक होत आहे.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा


























