स्वेरीमध्ये भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

माजी सुवर्णपदक विजेते चंद्रशेखर विजापुरे यांच्या हस्ते भारतमाता पूजन; प्रा. दिपक घाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Independence Day Celebrated at SVERI, Solapur, Pandharpur, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर प्रतिनिधी 

पंढरपूरः गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटच्या भव्य प्रांगणात भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यापीठाच्या परीक्षेत सुवर्णपदक विजेते माजी विद्यार्थी चंद्रशेखर विजापुरे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर मिरज महाविद्यालय, मिरज मधील रसायनशास्त्राचे सहा. प्राध्यापक दिपक घाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

        पाहुण्यांच्या स्वागतानंतर लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनी तेजश्री डांगे यांनी भारतासाठी योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या कार्याचे अनुकरण करणे आवश्यक असल्याचे सांगून भारताची कालची व आजची परिस्थिती सांगितली. स्वेरीच्या विद्यार्थिनी नगमा पटेल यांनी 'आवाज दो हम एक है ..!’ हे गीत सुमधुर चालीत गायले. सोनाली कांबळे यांनी जबाबदारी आणि स्वातंत्र्य यावर इंग्रजीतून विचार मांडले तसेच आलीशा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘ओ देश मेरे तेरी शान से बढ़ के....' हे गीत गायले. 

धैर्यशील पवार यांनी तिरंगा हा आपल्या रक्तात असतो त्यामुळे देशाचा विचार नेहमी मनात असू द्यावा, हा विचार मांडला. नगमा व त्यांच्या सहकाऱ्यांनी 'ए मेरे वतन के लोगो..!’ हे सामुहिक गीत गायले. गौरी सुरवसे व प्राजक्ता चिखलीकर यांनी देखील भारत देशावरील गीत गायले. प्रमुख पाहुणे प्रा.दिपक घाटे म्हणाले की, ‘भारताच्या तिरंग्यात असणारे सर्व रंगांचे वेगळे महत्व असून मधल्या आरी ह्या सर्व भारतीयांच्या प्रगतीमध्ये सातत्य राखण्यासाठी सूचित करतात. त्याप्रमाणे डॉ. रोंगे सरांनी छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करून आज एवढे मोठे साम्राज्य उभे केले असून हे शिस्तीचे एक प्रतिक आहे.’ असे सांगून स्वेरीच्या वाटचालीवर प्रकाश टाकला. 

उज्वला बहन यांनी युवकांनी व्यसनाधीनतेला आवर घालण्याची गरज असून आज त्यांना मोबाईलचे व्यसन लागले असून युवक वर्ग आज बळी पडत आहे. याला वेळीच रोखण्याचे आवाहन केले. यावेळी सर्वांनी व्यसनापासून दूर राहण्याची शपथ घेतली. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘स्वेरीयन’ या त्रैमासिकाचे तसेच स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयांतील विविध विभागांच्या न्यूज बुलेटीन्सचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी हॉलीबॉल, खोखो कब्बडी तसेच इतर क्रीडा क्षेत्रात स्वेरीसाठी प्रभावी कार्य करून नंबर पटकाविलेल्या सिद्धी चव्हाण, चंदना भोसले, गौरी माने, वैष्णवी डोईफोडे, जुई गवसाने, अंकिता जाधव, प्रगती पवार, श्रुष्टी चौधरी, मिनाक्षी पवार, आदिती गवसणे, पूर्वा चौधरी व इतर सहकार्यांना सन्मानित केले.

 यावेळी प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्राच्या उज्वला बहेन, स्वाती बहन, वसते भाई, ऋषिकेश भट्टड, सुहास देशपांडे, स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, सचिव डॉ. सुरज रोंगे, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम.पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.एस.व्ही. मांडवे, स्वेरी लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. बनकर, स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम.एस.मठपती, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह स्वेरी अंतर्गत असलेल्या अभियांत्रिकी व फार्मसीचे विद्यार्थी, पालक वर्ग उपस्थित होते. स्नेहा मोटे, संयोगिता माने, डॉ.निता तळवलकर यांनी सुत्रसंचालन केले तर डिप्लोमाच्या विद्यार्थिनी सचिवा वैष्णवी नवले यांनी आभार मानले.

'पुढच्या झेंडावंदन दिनी डॉ. रोंगे सर हे आमदार म्हणून ध्वजारोहण करतील' असे भाकीत प्रमुख पाहुणे प्रा.दिपक घाटे यांनी केले.

      -----------------

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------


Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !