पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ - उमेदवारीची अधिकृत घोषणा बाकी, पण मंगेश चिवटे यांच्याबाबत शिक्षकांमध्ये वाढती चर्चा

वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील चमकदार कामगिरीमुळे जनसंपर्क मजबूत - पाच जिल्ह्यांतील राजकीय हालचालींना वेग
Pune Division Teachers' Constituency election, mangesh chivate, Maharashtra, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर वैभव कुलकर्णी
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विविध पक्षांकडून व संघटनांकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी असले, तरी सामाजिक कार्यकर्ते मंगेश चिवटे यांच्या नावाची जोरदार चर्चा शिक्षक व सर्वसामान्यांमध्ये पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांतील त्यांचा व्यापक जनसंपर्क आणि सामाजिक क्षेत्रातील कामगिरीमुळे या मतदारसंघातील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

अडीच वर्षांत ४५० कोटींची वैद्यकीय मदत
मंगेश चिवटे यांनी आरोग्य व सामाजिक क्षेत्रात राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
रुग्णसेवा: अडीच वर्षांच्या कालावधीत सुमारे ५१ हजार रुग्णांना उपचारासाठी मदतीचा हात दिला असून, विविध योजनांच्या माध्यमातून जवळपास ४५० कोटी रुपयांची वैद्यकीय मदत मिळवून देण्यात त्यांनी समन्वयकाची भूमिका बजावली आहे.
व्यापक संपर्क: संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्यविषयक संकटात सापडलेल्या गरजूंपर्यंत पोहोचून त्यांना वेळेत वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत.

शिक्षक आणि राजकीय वर्तुळात उत्सुकता
पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या शिक्षक मतदारसंघात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर जनसंपर्काची गरज असते. या पार्श्वभूमीवर, चिवटे यांनी आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामामुळे शिक्षक, संस्थाचालक आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पक्षाची अधिकृत घोषणा कधी होते, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

-----------------

Sudhakar pant paricharak, anniversary, shivshahi new, advertise,

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !