जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य नियोजनबद्ध व निर्धारित वेळेत पूर्ण केल्याच्या कार्याची दखल
शिवशाही वृत्तसेवा,छ.संभाजीनगर (मनोज चव्हाण)
केंद्र सरकारच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या भारताची जनगणना टप्पा क्रमांक ०१ अंतर्गत कन्नड नगर परिषद शहरातील जनगणना कार्य सर्वप्रथम पूर्ण केल्याबद्दल श्री संत ज्ञानेश्वर विद्या मंदिर, शिवनगर येथील सहशिक्षक श्री. अरविंद भीमराव पदमे यांचा स्वातंत्र्य दिनाच्या शुभदिनी सत्कार करण्यात आला.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी मा. श्री. रवींद्र लांडे व उपमुख्याधिकारी श्री. विष्णू राठोड यांच्या हस्ते श्री. पदमे यांचा गौरव करण्यात आला. जनगणना हे महत्त्वाचे राष्ट्रीय कर्तव्य असून, सोपविण्यात आलेले कार्य नियोजनबद्ध पद्धतीने व निर्धारित वेळेत पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली.
यावेळी सत्कार स्वीकारताना श्री. अरविंद पदमे यांनी हा सन्मान केवळ आपला नसून, जनगणना कार्यात सहकार्य करणाऱ्या सर्वांचा असल्याचे सांगितले. जनगणना कार्यासाठी नियुक्त पर्यवेक्षक करण राठोड, जनगणना समन्वयक प्रशांत देशपांडे, तांत्रिक विभागाचे गणेश राऊत, तसेच आपल्या कार्याची दखल घेऊन प्रशासनापर्यंत नाव पोहोचविणारे प्रवीण दाभाडे यांचे त्यांनी विशेष आभार मानले.
तसेच कार्यक्षेत्रातील नगरसेवक प्रेमसिंग बैनाडे, प्रकाशशेठ पुनमचंदजी पिरथानी, सुशांतजी भारूका, पंडित साहेब तसेच प्रभागातील सर्व नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि जनगणना कार्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्यामुळे हे कार्य यशस्वीपणे पूर्ण करता आले, असे श्री. पदमे यांनी सांगितले.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सत्कारामुळे त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, राष्ट्रीय कर्तव्याप्रती असलेली त्यांची बांधिलकी अधोरेखित झाली आहे.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



























