ज्येष्ठांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी भुईंज पोलीस ठाण्यात होणार दरमहा 'जनता दरबार'

ज्येष्ठांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी भुईंज पोलीस ठाण्यात होणार दरमहा 'जनता दरबार'
 
Public Grievance Hearing, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

ज्येष्ठांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी भुईंज पोलीस ठाण्यात दरमहा 'जनता दरबार' आयोजित करण्याचा एक अत्यंत स्तुत्य आणि महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक  पूनम झगडे यांनी दिली.यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे.
 ज्येष्ठ नागरिकांनी अनोळखी फोन, बनावट लिंक, ओटीपी तसेच बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नये. आर्थिक फसवणूक होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
भुईंज येथे ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित सहविचार सभेत त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसह ऑनलाइन व्यवहार, बँकिंग फसवणूक, कौटुंबिक व सामाजिक समस्या तसेच पोलिस प्रशासनाकडून अपेक्षित असलेल्या सुविधांवर चर्चा झाली.
झगडे म्हणाल्या, ज्येष्ठ नागरिक समाजातील अनुभवसंपन्न घटक आहेत. त्यांच्या सुरक्षिततेला पोलिस प्रशासनाकडून प्राधान्य दिले जात आहे. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने ज्येष्ठांनी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. संशयास्पद फोन किंवा आर्थिक व्यवहाराचा प्रकार निदर्शनास आल्यास विलंब न करता पोलिसांशी संपर्क साधावा. ज्येष्ठांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी जनता दरबार उपयुक्त ठरेल.
यावेळी संघाचे अध्यक्ष रामदास जाधव यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष जगन्नाथ दगडे यांनी प्रास्ताविक केले. सचिव अशोकराव चव्हाण व रमेश भोसले यांनी निवेदन केले. कार्यक्रमास बाळासाहेब  वाघ, दिलीप दळवी यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​या उपक्रमामुळे पोलीस आणि ज्येष्ठ नागरिकांमधील संवाद वाढून त्यांना वेळेत आणि योग्य न्याय मिळण्यास मोठी मदत होईल.

        -----------------

Sudhakar pant paricharak, anniversary, shivshahi new, advertise,

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !