ए.आय. सह विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
शिक्षण मंडळ, कराड संचालित महिला महाविद्यालय, कराड येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभाग आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बी. कॉम. भाग-३, सत्र-६ च्या व्यवसाय अभ्यास विषयाच्या सुधारित अभ्यासक्रमावर आधारित एकदिवसीय क्षमता विकास शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाली.
कार्यशाळेचे उद्घाटन वाणिज्य व व्यवस्थापन अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तथा वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे विभागप्रमुख डॉ. केदार मारुलकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत बल्लाळ होते. डॉ. ज्योती मोहोळकर यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेची भूमिका व उद्दिष्टे स्पष्ट केली.
या कार्यशाळेत ‘Business Application of AI’ या विषयावर डॉ. केदार मारुलकर, ‘Business Analytics’ या विषयावर डॉ. नीलम जाधव, तर ‘Commercial Law’ या विषयावर प्राचार्य डॉ. राजाराम साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सुधारित अभ्यासक्रमाची रचना, आधुनिक अध्यापन पद्धती, कृत्रिम बुद्धिमत्तेचा व्यवसाय क्षेत्रातील उपयोग, व्यवसाय विश्लेषण तसेच कौशल्याधिष्ठित शिक्षण याबाबत तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेतील तज्ज्ञांशी संवाद सत्रात सहभागी शिक्षकांनी विविध शैक्षणिक व व्यावसायिक विषयांवर प्रश्न विचारून चर्चा केली. बदलत्या व्यवसायविश्वाच्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक कौशल्ये विकसित करण्यासाठी अध्यापनामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करता येईल, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी सहभागी प्राध्यापकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. विविध महाविद्यालयांमधून प्राध्यापकांनी या प्रशिक्षण कार्यशाळेत सहभाग घेतला.
समारोप समारंभास प्राचार्य डॉ. राजाराम साळुंखे व डॉ. अखिलेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यशाळेच्या आयोजनाची जबाबदारी श्रीमती दिपाली शिंदे यांनी पाहिली, तर श्रीमती वैशाली काटकर यांनी समन्वयक म्हणून कार्य केले. डॉ. विलास सुर्वे व श्रीमती रेखा धुळप यांनी सूत्रसंचालन केले. श्री. प्रशांत इनामदार यांनी आभार मानले.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा































