घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमात मोठा बदल - आता २५ दिवसांनी करता येणार रिफिल बुकिंग

शहर आणि ग्रामीण भागासाठी एकच नियम, केंद्र सरकारचा एलपीजी ग्राहकांना मोठा दिलासा
Big update, domestic LPG cylinder, national, Maharashtra, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (वैभव कुलकर्णी)
घरगुती एलपीजी सिलिंडर ग्राहकांसाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांना पुढील गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी असलेला ४५ दिवसांचा कालावधी आता कमी करून २५ दिवस करण्यात आला आहे. त्यामुळे शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातील ग्राहकांनाही आता २५ दिवसांच्या अंतराने एलपीजी रिफिल बुक करता येणार आहे. हा निर्णय तातडीने लागू करण्याच्या सूचना तेल विपणन कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. 

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे विशेषतः ग्रामीण भागातील घरगुती गॅस ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी एलपीजी पुरवठ्यावरील ताण लक्षात घेऊन शहरी भागासाठी २५ दिवस, तर ग्रामीण भागासाठी ४५ दिवसांचे बुकिंग अंतर ठेवण्यात आले होते. मात्र, सध्या एलपीजीचा पुरवठा सुरळीत होत असून रिफिलचा प्रलंबित साठाही मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने सरकारने हा निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्रामीण ग्राहकांना विशेष फायदा
नव्या निर्णयानुसार आता शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी २५ दिवसांचा समान नियम लागू राहणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना ४५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार नाही. गरजेनुसार २५ दिवस पूर्ण झाल्यानंतर पुढील सिलिंडरचे रिफिल बुकिंग करता येणार आहे. 

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी बुकिंग प्रक्रिया अधिक सुलभ होणार असून, शहर-ग्रामीण भागातील बुकिंग अंतरातील तफावत दूर झाली आहे.

मार्च २०२६ मध्ये सरकारने त्यावेळच्या परिस्थितीत शहरी भागासाठी २५ दिवस आणि ग्रामीण भागासाठी ४५ दिवसांचे अंतर कायम असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, ७ सप्टेंबर २०२६ रोजी नव्याने जाहीर केलेल्या निर्णयानुसार ग्रामीण भागातील ४५ दिवसांचा कालावधी कमी करून आता २५ दिवस करण्यात आला आहे.

-----------------

Sudhakar pant paricharak, anniversary, shivshahi new, advertise,

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !