मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब, आवश्यक पदे व खर्चाच्या तरतुदीस मान्यता
शिवशाही वृत्तसेवा, माढा (मनिषा कुलकर्णी)
सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील नागरिकांची व पक्षकारांची बऱ्याच दिवसांची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली आहे. माढा येथे नवीन ‘जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय’ स्थापन करण्यास राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत (विधि व न्याय विभाग) अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. या न्यायालयासाठी आवश्यक असणारी पदे निर्माण करण्यास तसेच त्यासाठी लागणाऱ्या खर्चाच्या तरतुदीस राज्य शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे.
आ. अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत जयश्री धनंजय पाटील यांनी या न्यायालयाच्या स्थापनेसाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. माढा तालुका हे क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे असून, येथे फौजदारी व दिवाणी स्वरूपाचे अनेक दावे प्रलंबित असतात. माढ्यापासून सोलापूर हे अंतर साधारण ५५ किलोमीटर असल्यामुळे पक्षकार, वकील आणि नागरिकांना न्यायालयीन कामकाजासाठी सतत सोलापूरला फेऱ्या माराव्या लागत होत्या. यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होत होता. ही बाब लक्षात घेऊन आमदार अभिजीत पाटील यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विधि व न्याय विभागाकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती.
निर्णयामुळे होणारे प्रमुख फायदेवेळ आणि खर्चाची बचत:आता माढा परिसरातील नागरिकांना न्यायालयीन कामासाठी दूर सोलापूरला जाण्याची गरज भासणार नाही.सुलभ न्यायप्रक्रिया:स्थानिक पातळीवरच अतिरिक्त सत्र न्यायालय उपलब्ध झाल्याने खटल्यांची सुनावणी वेगाने होऊन न्याय मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होईल.आवश्यक पदांची निर्मिती:या न्यायालयाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी आवश्यक असणारे न्यायाधीश, अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे आणि प्रशासकीय खर्चाला मंजुरी मिळाल्याने प्रत्यक्ष कामकाज लवकरच सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरकारचे आभार
माढा येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल आमदार अभिजीत पाटील यांनी महायुती सरकारसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
हा निर्णय माढा तालुक्यातील वकील वर्ग, पक्षकार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक ठरला असून संपूर्ण तालुक्यातून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
-----------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा






























