11 सप्टेंबर पासुन बेमुदत उपोषण करण्याचा इशारा
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, श्रीमंत छ. शिवाजी महाराज यांच्या वंशाची ए. आय. मार्फीग फोटो फेसबुक व इन्स्टाग्राम वरती पाठवून बदनामी करणाऱ्या अज्ञात समाजकंटक व्यक्तींचा पोलिसांनी तातडीने शोध घेऊन त्यांना उद्या दि. 10 पर्यंत अटक करावी अन्यथा दि. 11 सप्टेंबर 2026 पासुन बेमुदत उपोषण करणार आहे असा इशारा रिपब्लिकन सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश उबाळे यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदनही रमेश उबाळे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छ. शिवाजी महाराज वंशज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची ए. आय. मॉर्फीग फोटो फेसबुकपोष्टवर बनवून बदनामी करण्यात आली आहे. ज्या कोणी अज्ञात व्यक्तींनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भोसले यांची बदनामी केली आहे त्यांना पोलिसांनी तत्काळ अटक केली पाहिजे जेणे करुन छ. शिवाजी महाराज यांच्या वंशजाची बदनामी करण्याचे कुणी धाडस करणार नाही. महाराष्ट्रात ज्यांना दैवत मानले जाते आशा छत्रपती घराण्याची बदनामी करण्याचे धाडस फक्त राजकीय द्वेषापोटी करण्यात येत आहे. राजकीय विरोध वैचारिक असावा. राजघराण्याची बदनामी करायची याला कसले राजकीय धाडस म्हणायचे? आपण बदनामी करताना कोणतीही शहानीशा न करता उचलली जीभ लावली टाळ्याला आशा पद्धतीच्या कमेंट व पोष्ट टाकून छत्रपती घराण्याची बदनामी केल्यामुळे सर्वच समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. पक्ष वेगवेगळे असतील विचारधारा भिन्न असेल परंतु परंतु ज्यांनी कुणी ही बदनामी केली आहे त्यांना श्रीमंत छ. शिवाजीमहाराजांचा विसर काही समाजकंटकांना पडला आहे. छत्रपती घराण्यांची बदनामी आम्ही खपवून घेणार नाही. आमचा राजकीय विरोध किंवा मतभेद असतील परंतु तेवढाच गादीचा मान आम्ही राखतो.
ज्या समाजकंटक व्यक्तींनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची सोशल मीडियावर पोष्ट टाकून बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना तात्काळ अटक करा अन्यथा आपण दि. 11 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालया बाहेर अमरण उपोषण करणार आहे. असा इशारा रमेश उबाळे यांनी दिला आहे.
यावेळी रिपब्लिकन सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश उबाळे, सातारा जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे, मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष साईनाथ खंडागळे ; जिल्हा महासचिव नितीन रोकडे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष जमीर शेख आदी उपस्थित होते. निवेदनाच्या प्रति मा. उपमुख्यमंत्री, मा. बांधकाम मंत्री, मा. पालकमंत्री, मा. खासदार उदयनराजे भोसले, मा. जिल्ह्याधिकारी सो, मा. पोलीस अधीक्षक, मा. पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्याचे रमेश उबाळे यावेळी म्हणाले.
-----------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा






























