दिशा समितीच्या बैठकीत विकास योजनांचा सविस्तर आढावा
शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर, (वैभव कुलकर्णी)
जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समिती अर्थात ‘दिशा’ची बैठक आज सोलापूर येथील नियोजन भवन येथे समितीच्या अध्यक्ष खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. समितीचे सह अध्यक्ष खासदार धैर्यशील मोहिते-पाटील हेही या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय पेयजल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम, राष्ट्रीय आरोग्य अभियान, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत मिशन, दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रम, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, आरडीएसएस (RDSS) यांसह विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आणि प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचणे गरजेचे आहे. योजनांची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी तातडीने दूर कराव्यात, तसेच प्रलंबित कामांना गती देऊन विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने, जबाबदारीने आणि अधिक कार्यक्षमतेने काम करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
विविध विकास योजनांच्या माध्यमातून नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांचा प्रत्यक्ष लाभ अधिक प्रभावीपणे मिळावा, यासाठी प्रशासकीय यंत्रणेने योजनांच्या अंमलबजावणीवर सातत्याने देखरेख ठेवण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली. प्रलंबित कामांचा पाठपुरावा करून त्यांना गती देण्याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
या बैठकीस खा. ज्योती वाघमारे, आ. अभिजीत पाटील, सोलापूर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
-----------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा






























