माजी आमदार राम सातपुते यांनी केले आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांना अभिवादन

शिंदेवाडीत तरुणांच्या लक्षणीय उपस्थितीत आणि उत्साहात जयंती साजरी
raje umaji naik jayanti, mla ram satpute, malshiras, solapur, shivshahi news, 
शिवशाही वृत्तसेवा, माळशिरस (वैभव कुलकर्णी)
ब्रिटिश सत्तेविरुद्ध स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकणारे आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांची जयंती माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी मा.आमदार रामभाऊ सातपुते यांनी क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध १८५७ च्या उठावापूर्वीच उमाजी नाईक यांनी बंड पुकारून स्वातंत्र्याची ज्योत चेतवली होती. गरीब, शेतकरी आणि उपेक्षित घटकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांनी संघर्ष केला. तसेच स्वतःचा जाहीरनामा काढून ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देत स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला.

यावेळी माजी आमदार राम सातपुते म्हणाले, “आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचे शौर्य, धैर्य आणि अखंड देशप्रेम हे संपूर्ण देशासाठी कायम प्रेरणादायी राहील. त्यांच्या बलिदानातून आणि संघर्षातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी तसेच तळागाळातील जनतेच्या हक्कांसाठी अविरत कार्य करण्याचा संकल्प आपण सर्वांनी केला पाहिजे.”

उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला शिंदेवाडी तसेच परिसरातील तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या स्मृतीस नतमस्तक होत त्यांच्या शौर्याला अभिवादन केले.

कार्यक्रमादरम्यान झालेल्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून उमाजी नाईक यांच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचे स्मरण करत त्यांच्या विचारांचा आणि संघर्षाचा वारसा पुढे नेण्याचा संदेश देण्यात आला.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

-----------------

Sudhakar pant paricharak, anniversary, shivshahi new, advertise,

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !