वृक्षारोपण कार्यक्रमात पर्यावरण रक्षण व संवर्धनाचा संदेश देण्यात आला .
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
पर्यावरण रक्षण व संवर्धनाचा संदेश देत, कणूर येथील श्री साई समर्थ ॲग्रो टुरिझम येथे पतंजली योग समिती, सातारा यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विधिवत होम-हवन करण्यात आले. त्यानंतर विविध प्रजातींच्या शंभर वृक्षांची लागवड उत्साहात करण्यात आली.
यामध्ये आंबा, नारळ, पेरू, चिकू, वड, पिंपळ, मोहगणी, लिंब, आवळा, कदंब, सिल्व्हर ओक आदी आठ ते दहा फूट उंचीच्या वृक्षांचा समावेश होता.
या कार्यक्रमास भारत स्वाभिमानचे अध्यक्ष निलेश पिसाळ, पतंजलीच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य डॉ. शंकर केंजळे, श्रीमंत झांजुर्णे , लतिका केंजळे, मोहन चव्हाण, दत्ता ननावरे, युवा जिल्हाध्यक्ष प्रवीण मोरे, किसान जिल्हाध्यक्ष विनायक शेलार, पतंजली योग समितीचे जिल्हाध्यक्ष अनिल जरे, हनुमंत पोळ, डॉ. सुनील देशपांडे, डॉ. स्वाती देशपांडे, अरविंद फडतरे, बाळकृष्ण शिंदे, डॉ. सुष्मिता जैन, पत्रकार राहुल तोडकर, माऊली पोळ, सुनंदाताई कट्टे, पत्रकार प्रशांत थोरवे, सारिका गवते, प्रिया चव्हाण आदी उपस्थित होते. तृतीयपंथी सातारा जिल्हाध्यक्ष रेणुका पुणेकर यांचीही यावेळी उपस्थिती होती.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून कणूर परिसर अधिक हिरवाईने नटविण्याचा संकल्प करण्यात आला. वृक्षलागवडीबरोबरच लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
"वृक्ष हेच आपले खरे जीवन असून, येणाऱ्या पिढीला स्वच्छ हवा आणि निरोगी पर्यावरण देण्यासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे." "केवळ वृक्षारोपण करून थांबणे पुरेसे नाही, तर लावलेल्या प्रत्येक रोपाचे झाड होईपर्यंत संगोपन करणे हे आपले खरे कर्तव्य आहे. पतंजली योग समिती योग आणि आरोग्यासोबतच निसर्ग रक्षणासाठी नेहमीच तत्पर राहील."
पतंजली योग समिती सातारा
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा


























