वाईच्या महसूल कारभाराविरोधात आंदोलनाचा एल्गार

विक्रम वाघ- प्रणित मोरे यांचे बेमुदत उपोषण सुरू

Indefinite hunger strike, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे

वाई तालुक्यातील महसूल प्रशासनाच्या कारभाराविरोधात भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विक्रम वाघ आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रणित मोरे यांनी वाई येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. महसूल, पाटबंधारे, गौण खनिज उत्खनन, दस्त नोंदणी आणि महसूल अभिलेखांशी संबंधित कथित गैरप्रकारांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे.

वाघ आणि मोरे यांनी यापूर्वी विविध तक्रारी, निवेदने व पुरावे प्रशासनाकडे सादर करूनही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसल्याचे त्यांनी सांगितले.

सोनगिरवाडी (ता. वाई) येथील पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या जमिनीवरील कथित अतिक्रमण व अनधिकृत बांधकामाची चौकशी करून ते तातडीने हटवावे, तसेच संबंधित जबाबदार व्यक्तींवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रभावी कारवाई केली नसल्याचाही आंदोलकांचा आरोप आहे.

वाई तालुक्यात मागील काही वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप असलेल्या बेकायदेशीर गौण खनिज उत्खननाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. या प्रकरणात संरक्षण किंवा सहकार्य केल्याचा संशय असलेल्या महसूल अधिकाऱ्यांसह तत्कालीन व विद्यमान तहसीलदारांच्या भूमिकेचीही चौकशी करून दोषी आढळल्यास शिस्तभंग व फौजदारी कारवाई करावी, असे निवेदनात नमूद आहे.

 वाई तहसीलदारांनी सन २०२२ ते २०२६ या कालावधीत दिलेले आदेश, निकाल व निर्णय यांची स्वतंत्र, निष्पक्ष व खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या गैरप्रकार अथवा नियमबाह्य निर्णय आढळल्यास संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

वाई तालुक्यातील मिळकत संदर्भातील काही प्रकरणांमध्ये दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तांच्या महसूल अभिलेखांतील नोंदी, तसेच नोंदी रद्द करण्यासंदर्भातील तक्रारींची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. नागरिकांना दस्त नोंदणी व महसूल अभिलेखांच्या कामकाजात अडथळे, विलंब किंवा त्रास होत असल्याच्या तक्रारींचीही उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी आहे.

वाई मंडल अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील महसूल विषयक कामकाजात सर्वसामान्य नागरिकांची कथित पिळवणूक, मनमानी व अधिकारांचा गैरवापर होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. मंजूर फेरफार, आदेश आणि इतर महसुली कामकाजाची खातेनिहाय तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर प्रशासकीय व विभागीय कारवाई करावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या मालमत्तेचीही चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

 या सर्व बाबी अत्यंत गंभीर स्वरूपाच्या असून त्यांचा थेट संबंध सर्वसामान्य नागरिकांना न्याय, पारदर्शक प्रशासन आणि कायद्याच्या अंमलबजावणीशी असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. प्रशासनाने तातडीने स्वतंत्र व निष्पक्ष चौकशीचे आदेश देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, रिपब्लिकन पार्टी (आंबेडकर)च्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. आंदोलनस्थळी संतोष जाधव, सोमनाथ धोत्रे, अजीम इनामदार, स्मिता जगताप, आयेशा पटणी, सचिन पाटणे, अजय गायकवाड आदी उपस्थित होते.

"आंदोलकांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. या संपूर्ण प्रकरणात मला आणि माझ्या पतींना विनाकारण गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी शासकीय अधिकारी आहे आणि तोच विभाग सांभाळत असल्याने मला जाणूनबुजून त्रास दिला जात आहे. नागरिकांना संविधानिक मार्गाने न्याय मागण्याचा अधिकार आहे. मात्र, यातील तथ्य लवकरच समोर येईल आणि योग्य वेळी पत्रकार परिषद घेऊन योग्य माहिती सादर करेन."

सोनाली मेटकरी, तहसीलदार वाई

    -----------------

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------


Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !