पोवाड्यातून बाजीप्रभूंच्या शौर्याची गाथा प्रभावीपणे मांडण्यात आली
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या अतुलनीय पराक्रमाची गाथा पावनखिंडीत पोवाड्याच्या माध्यमातून सादर करण्यात आली. शिव राष्ट्र ट्रेकर्स, सातारा यांच्या वतीने आयोजित ‘पन्हाळा ते पावनखिंड’ पदभ्रमण मोहिमेच्या समारोपप्रसंगी शाहीर शरद यादव व त्यांच्या सहकाऱ्यांनी बहारदार पोवाडा सादर केला.
पन्हाळा ते पावनखिंड पायी आलेल्या सातारा जिल्ह्यातील सुमारे ६० ट्रेकर्स तसेच पर्यटकांसमोर झालेल्या या सादरीकरणाने वातावरण शिवमय झाले. पोवाड्यातून बाजीप्रभूंच्या शौर्याची गाथा प्रभावीपणे मांडण्यात आली.
या सादरीकरणासाठी शाहीर शरद यादव यांना सचिन पवार, उद्धव निकम, राजेंद्र गायकवाड (बोपर्डी) यांनी सहकार्य केले, तर ढोलकीची साथ विश्वनाथ कांबळे यांनी दिली. शाहीर शरद यादव हे जिल्हा परिषद नागेवाडी शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून, पंचायत समिती वाईच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी ऐतिहासिक पोवाड्यांचे गायन व सादरीकरण करून इतिहासाचा जागर घडवित आहेत.
सलग तिसऱ्या वर्षी आयोजित या मोहिमेत ६० ट्रेकर्सनी सहभाग घेतला. यावेळी शिव राष्ट्र ट्रेकर्सचे अध्यक्ष सचिन सावंत, कार्याध्यक्ष उद्धव पवार, सचिव सचिन जाधव, कोषाध्यक्ष रमेश चव्हाण, नीलेश पोरे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा


























