“डॉ. अर्जुन जाधव यांची ज्ञानसेवा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी” : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

किसन वीर महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. अर्जुन जाधव यांचा ३८ वर्षांच्या सेवेनंतर भव्य सेवागौरव समारंभ संपन्न

A ceremony honoring service, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

किसन वीर महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. अर्जुन साहेबराव जाधव यांच्या दीर्घ व निष्ठावंत ३८ वर्षांच्या शैक्षणिक सेवेचा भव्य सेवागौरव समारंभ अत्यंत उत्साहात व भावूक वातावरणात पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जनता शिक्षण संस्थेचे संचालक मिलिंद दादा पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलताना नामदार मकरंद पाटील म्हणाले, “डॉ. जाधव यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी सातत्याने केला. भौतिकशास्त्रासारख्या अवघड मानल्या जाणाऱ्या विषयात त्यांनी केलेली ३८ वर्षांची प्रदीर्घ ज्ञानसेवा भावी पिढ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरेल.”

डॉ. अर्जुन जाधव यांनी भौतिकशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करताना सुवर्णपदक पटकावले होते. विशेष म्हणजे हे सुवर्णपदक मिळविणारे ते किसन वीर महाविद्यालयातील पहिलेच विद्यार्थी ठरले होते. कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना त्यांनी अत्यंत जिद्दीने व परिश्रमाने पीएच.डी. पदवीदेखील संपादन केली.

या गौरव सोहळ्यात डॉ. आकांक्षा जाधव, प्रा. राजश्री जाधव, प्रा. माधवराव गुरव, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, विठ्ठल शिंदे, राजेंद्र भोसले व प्रा. मोहन भोसले यांनी मनोगत व्यक्त करताना डॉ. जाधव यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच प्रा. गणेश चव्हाण व प्रा. गणेश कोरे यांनी डॉ. जाधव यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याचा यथोचित गौरव केला.

या प्रसंगी मा. मिलिंद दादा पाटील, जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे, वृषालीताई चव्हाण, महादेव मस्कर, अविनाश फरांदे यांच्यासह महाविद्यालयातील आजी-माजी प्राध्यापक, सहकारी कर्मचारी, विद्यार्थी व विविध गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सुटसुटीत सूत्रसंचालन विठ्ठल माने यांनी केले, तर शेवटी प्रा. गणेश चव्हाण यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.

      -----------------

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !