मिसाल वतन से मुहब्बत की २०२६ पुरस्काराने विनोद कुलकर्णींसह मान्यवरांचा गौरव

स्वातंत्र्यवीरांच्या कार्याचा वारसा जपणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा १५ ऑगस्टला सन्मान

Misal Watan Se Muhabbat Ki 2026 Award, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, सातारा प्रतिनिधी शुभम कोदे

स्वातंत्र्य संग्रामात देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाला आणि देशप्रेमाला मानवंदना देत, त्यांच्या कार्याचा वारसा आपल्या कर्तृत्वातून पुढे नेणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा ‘मिसाल वतन से मुहब्बत की – २०२६’ अर्थात ‘उदाहरण आदर्श देशप्रेमाचे ’ या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट २०२६ रोजी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या पुरस्कारासाठी सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार व लेखक विनोद सूर्यनारायण कुलकर्णी यांच्यासह कुस्ती, माजी सैनिक, वकिली, शिक्षण, आडत व्यवसाय, सामाजिक, सार्वजनिक तसेच ऑटोमोबाईल क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांची निवड करण्यात आली आहे.

स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतींना मानवंदना देणारा अनोखा उपक्रम

मिसाल वतन से मुहब्बत की ’ हा केवळ पुरस्कार सोहळा नसून स्वातंत्र्यवीरांचा त्याग, संघर्ष, देशप्रेम, समाजसेवा आणि माणुसकीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रेरणादायी उपक्रम आहे. गत वर्षी पासून म्हणजे सन २०२५ पासून सातारा शहरातून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे.
साताऱ्यातील गेंडामाळ कब्रस्तानमध्ये स्वातंत्र्या साठी हौतात्म्य पत्करलेल्या व चिरनिद्रेत विसावलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतींना अभिवादन करताना, त्यांनी ज्या-ज्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले, त्याच क्षेत्रातील मूल्ये, निष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीची परंपरा पुढे नेणाऱ्या व्यक्तींचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून केला जातो.
देशप्रेम म्हणजे जिवाची बाजी लावून सीमेवर शस्त्र हाती घेऊन लढणे हे महत्वाचे आहेच.त्या बरोबरच अन्यायाविरुद्ध कायद्याची मशाल घेऊन उभे राहणे, निराधारांच्या डोळ्यातील अश्रू पुसणे, तुटणारे कुटुंब सावरणे, उपेक्षितांना आधार देणे आणि पीडिताला सुरक्षिततेचा आधार देणे, हीदेखील देशसेवेचीच रूपे आहेत. राष्ट्रनिर्मितीची बीजे रणांगणावरिल लढ्यात अंगार बनून प्रफुल्लित होतातच, तर माणुसकीच्या प्रत्येक कृतीतून त्याचे दर्शन घडते, या व्यापक विचारातून या पुरस्काराची संकल्पना साकारण्यात आली आहे.
देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर स्वातंत्र्यवीरांनी देश गौरवासाठी विविध क्षेत्रात केलेल्या समाज कार्या नुसार पुरस्कारार्थींची निवड केलेली आहे.
त्याबाबतचा तपशील -
स्वातंत्र्यसैनिक इम्तियाज मिर्झा मास्तर यांच्या लेखक, कवी व शायरी क्षेत्रातील योगदानाच्या स्मृतीप्रित्यर्थ
पत्रकार व लेखक
विनोद सूर्यनारायण कुलकर्णी यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पत्रकारिता, लेखन, कला, क्रीडा, साहित्य आणि सहकार क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले असून, ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा शहरात आयोजित करून साहित्यप्रेमींनी व देश परदेशातून प्रतिसाद मिळालेल्या या शतकपूर्व संमेलनाने साताऱ्याच्या नावलौकिक वाढविलेले आहे.
स्वातंत्र्यसैनिक पैलवान उमर बाळाभाई खाटिक यांच्या कुस्ती क्षेत्रातील योगदानाच्या स्मृतीप्रित्यर्थ
हिंदकेसरी पैलवान संतोष आबा वेताळ यांचा गौरव करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यसैनिक इब्राहिम फरास यांच्या माजी सैनिक म्हणून केलेल्या कार्याच्या स्मृतीप्रित्यर्थ माजीसैनिकशंकर माळवदे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
स्वातंत्र्यसैनिक इस्माईल साहेब मुल्ला यांच्या वकिली क्षेत्रातील कार्याच्या स्मृतीप्रित्यर्थ ॲड.मनीषाताई बर्गे यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यसैनिक महिताप शेख मास्तर यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाच्या स्मृतीप्रित्यर्थ
विविध पारितोषिके व सन्मान प्राप्त केलेले शिक्षक जावेद अर्शद सय्यद यांची निवड करण्यात आली आहे.
स्वातंत्र्यसैनिक अब्दुल जब्बार हकीम यांच्या आडत विभागातील उल्लेखनीय कार्याच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रवीण कांबळे यांचा गौरव करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यसैनिक शेख काका इनामदार यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याच्या स्मृतीप्रित्यर्थ माहेश्वरीचे माधव सारडा यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
स्वातंत्र्यसैनिक शफी शेख यांच्या सार्वजनिक क्षेत्रातील कार्याच्या स्मृतीप्रित्यर्थ समाजसेवक वसंतशेठ जोशी यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यसैनिक इस्माईल हकीम यांच्या ऑटोमोबाईल क्षेत्रातील कार्याच्या स्मृतीप्रित्यर्थ बागवान जमीयतच्या माध्यमातून उल्लेखनीय सामाजिक कार्य करणारे परवेज बागवान यांना तसेच भारतरत्न ए पीजेअब्दुलकलामयांच्या स्मृतीप्रित्यर्थ वैद्यकीयक्षेत्रातजनसेवा केल्याबद्दल ह्या वर्षी डॉ कौशिक पाटील यांना ‘मिसाल वतन से मुहब्बत की – २०२६’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

देशप्रेमाची जिवंत मिसाल ; माणुसकीची प्रेरणा!
मिसाल वतन से मुहब्बत की – २०२६ हा पुरस्कार म्हणजे केवळ व्यक्तीच्या कार्याचा सन्मान नसून इतिहासाला वर्तमानाशी जोडणारी प्रेरणादायी कडी आहे. देशासाठी जगलेल्या आणि बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतींना समाजासाठी जगणाऱ्या आजच्या कर्मयोगींशी जोडणारी ही मानवंदना असल्याचे आयोजकांनी सांगितले.
मिसाल वतन से मुहब्बत की–२०२६* उदाहरण आदर्श देशप्रेमाचे
प्रेरणा माणुसकीची
यासंकल्पनेतून आयोजित पुरस्कार सोहळा १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिन उत्सवात संपन्न होणार आहे. सातारकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देशप्रेमाची ज्योत अधिक तेजस्वी करावी, असे आवाहन खिदमत-ए-खल्क व जमीयतुल उलमा वल हुफ्फाज, सातारा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

      -----------------

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------


Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !