अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शासकीय वाहनांवरील काळ्या काचा काढण्याचे आदेश
शिवशाही वृत्तसेवा,शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
सामान्य जनतेला नियम शिकवणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनीच नियमबाह्य पद्धतीने काळ्या काचा लावलेल्या वाहनांचा वापर सुरू केला होता. ही बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पारनेर चे तालुका अध्यक्ष श्री. अविनाश मुरलीधर पवार यांनी दि. 29/07/2026 रोजी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे पुराव्यासह तक्रार केली होती.
मनसेच्या तक्रारीनंतर मोठी कारवाई
पवार यांनी आपल्या तक्रारीत स्पष्ट म्हटले होते की, "अधिकृत शासकीय वाहनांवर बेकायदेशीरपणे काळ्या रंगाच्या काचा लावल्या आहेत. अशा वाहनांवर तात्काळ कारवाई करून काळ्या काचा काढण्यात याव्यात. "अन्यथा मनसे कार्यकर्ते जिथे RTO ची गाडी दिसेल तिथे ती फोडतील."
या कडक भूमिकेची दखल घेत प्रादेशिक परिवहन अधिकारी, अहिल्यानगर विनोद सगरे यांनी दि. 28/06/2025 रोजी कार्यालयीन आदेश क्र. 992 काढला आहे.
आदेशात काय आहे,
1. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शासकीय वाहनांवरील काळ्या काचा तात्काळ काढून, कायदेशीर कारवाई करावी.
2. सर्व तालुकानिहाय मोटर वाहन निरीक्षकांना आदेश देऊन तपासणी करून दोषी वाहनांवर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश.
3. केलेल्या कारवाईचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्याचे आदेश.
अविनाश पवार म्हणतात...
"सामान्य माणसाला हेल्मेट, सीट बेल्टसाठी दंड करणारे अधिकारी स्वतः नियम तोडत होते. मनसेने आवाज उठवल्यानंतर RTO ला कारवाई करावीच लागली. हे सत्याच्या विजयाचे पहिले पाऊल आहे. पुढे सुपा MIDC मधील अवैध उत्खन प्रकरणी पण आम्ही असेच दणके देऊ"
मनसेचा इशारा:-
15 दिवसात सर्व वाहनांवरील काळ्या काचा न काढल्यास संपूर्ण जिल्ह्यात मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा


























