वारकरी मंडळी संतप्त, वारीची शेकडो वर्षाची परंपरा पायदळी तुडवणाऱ्या गिरीश महाजन यांनी माफी मागावी अशी मागणी
शिवशाही वृत्तसेवा, सचिन कुलकर्णी (संपादक)
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून जळगाव जामनेर मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत पंढरीची वारी घडवण्यात आली. या वारीचे नेतृत्व स्वतः गिरीश महाजन यांच्या पत्नी तथा जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष साधनाताई महाजन करत होत्या तर व्यवस्थापन भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर सांभाळत होते. मात्र या वारीच्या वेळी एक वेगळाच आणि वारकरी संप्रदायाला न शोभणारा प्रकार पंढरपुरात पाहायला मिळाला.
ज्येष्ठ नागरिकांची वारी रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर मुक्कामाच्या जागी जाण्यासाठी दिंडी काढण्यात आली. या दिंडीत वारकरी संप्रदायाचा पारंपारिक टाळ मृदुंग आणि हरिनामाचा जयघोष नव्हता तर डॉल्बीवर कर्कश्य आवाजात रिमिक्स भक्ती गीते वाजत होती. मृदुंगाचा निनाद, टाळांचा मंजूर किनकिनाट, आणि भक्ती रसात भिजलेला हरिनामाचा जयघोष हे पंढरपूरच्या वारीचे वैशिष्ट्य मानले जाते. मात्र मंत्री गिरीश महाजन यांनी आयोजित केलेल्या वारीमध्ये कानाचे पडदे पडणारा डॉल्बीचा कर्कश्य आवाज, त्यावर वाजणारे रिमिक्स भक्ती गीते यामुळे या वारीला हिडीस आणि ओंगळवाणे स्वरूप आले होते.
एकीकडे सरकार महाराष्ट्रातील सण उत्सव डॉल्बीमुक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. गणेश उत्सव असो की नवरात्र, सार्वजनिक मंडळांना डॉल्बी न लावता पारंपारिक वाद्यांचा वापर करावा असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र हिंदुत्ववादी उजव्या विचारसरणी चे पाईक असणारे आणि सरकारमधीलच एक मंत्री असणारे गिरीश महाजन यांनी आयोजित केलेल्या पंढरपूरच्या वारीमध्ये पारंपारिक टाळमृदुंगाच्या ऐवजी करण करकश्य डॉल्बीच्या आवाजाने वारीत सहभागी वारकरीच नव्हे तर पंढरपूरच्या रस्त्यावरील नागरिक देखील त्रस्त झाले होते आणि ही कसली दिंडी अशा नजरेने या सर्व प्रकार कडे पाहत होते. मंत्री गिरीश महाजन आपण पंढरपूरच्या वारीचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न करत आहात का? असा प्रश्न ही दिंडी पाहणाऱ्या प्रत्येकाला पडला आहे.
याबाबत प्रश्न विचारला असता या वारीचे व्यवस्थापन करणारे भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी थातूरमातूर उत्तर देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आहे.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा