ऍड. संदीप वाघ यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक
शिवशाही वृत्तसेवा,माळशिरस (प्रतिनिधी वैभव कुलकर्णी)
"शिक्षणाच्या वाटचालीत विद्यार्थ्यांना साथ देत उज्ज्वल भविष्याची नवी सुरुवात" हा उद्देश समोर ठेवून, जि.प. प्राथमिक शाळा डोंबाळवाडी, वायसेवस्ती तसेच रूपनवरवस्ती क्र. २ येथील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप उपक्रम नुकताच अत्यंत उत्साहात पार पडला.
महेश धायगुडे व तानाजी ठेंगिल यांच्या विशेष पुढाकारातून, शाळा प्रेमी ऍड. श्री. संदीप वाघ यांच्या केलफॉस फाउंडेशन, पुणेच्या वतीने हा संपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. यावर्षी 'शिवशाही न्यूज नेटवर्क' परिवाराच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त ठरलेल्या ऍड. संदीप वाघ यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम राखत, या फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून दिली. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि मनात शिक्षणाची नवी उमेद निर्माण झाली आहे. उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये:
या उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना शालेयोपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात आले, ज्यामध्ये प्रामुख्याने खालील साहित्याचा समावेश होता:
स्कूूल बॅग,स्टिफिन बॅग,कंपास बॉक्स,पाण्याची बाटली,वह्या व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ व पालकांचे मोठे सहकार्य लाभले. यावेळी प्रमुख पाहुणे आणि मान्यवर म्हणून:
वायसे सर,नितीन पाटील,नितीन खिलारे,गणेश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण करण्यात आले.
“प्रत्येक मुलाच्या हातात शालेय साहित्य आणि प्रत्येक मुलाच्या मनात शिक्षणाची स्वप्ने असावीत, हीच केलफॉस फाउंडेशनची भूमिका आहे.”
— ऍड. श्री. संदीप वाघ (केलफॉस फाउंडेशन, पुणे)
या कौतुकास्पद सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी मोठा उत्साह पाहायला मिळाला असून, ग्रामस्थांच्या वतीने केलफॉस फाउंडेशन आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. अशा उपक्रमांतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सशक्त शिक्षणाचा पाया आणखी बळकट होत, जिल्हा परिषद शाळांकडे बघण्याच्या दृष्टिकोन एक सकारात्मक होत आहे.
-----------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



























