तत्कालीन लिपिक आणि कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात कागदपत्रांमध्ये अफरातफर आणि बनावटगिरी करणाऱ्यांवर कोरेगाव पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. नगरपंचायतीच्या मृत्युनोंदणी रजिस्टरमध्ये छेडछाड करून खोटा मृत्युदाखला मिळवल्याप्रकरणी सचिन विलास येवले आणि तत्कालीन लिपिक दिपाली गोरखनाथ बागल यांच्याविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२२ मध्ये कोरेगाव नगरपंचायतीमध्ये मृत व्यक्तीच्या नोंदीबाबत व दाखले निर्गमनाबाबत घडलेल्या प्रकाराची कसून चौकशी करण्यात आली. सचिन विलास येवले (रा. कोरेगाव) याने सन १९८१ मध्ये त्याच्या आजीचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती दिली आणि तत्कालीन लिपिक यांच्याशी संगनमत करून बनावट कागदपत्रे व खोट्या न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत मृत्युनोंदणी रजिस्टरमध्ये नोंदी केल्या.
जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा निबंधक (जन्म-मृत्यू) जिल्हा परिषद सातारा यांच्या निर्देशानंतर ही बनावट नोंद ४ मे २०२६ रोजी अधिकृतपणे रद्द करण्यात आली. याप्रकरणी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार अजित किन्हा बागल यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोरेगांव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार नागराज कदम करत आहेत.
-----------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



























