सहकार चळवळीत युवकांनी पुढे येण्याचे मान्यवरांचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा,कराड प्रतिनिधी शूभम कोदे)
शिक्षण मंडळ, कराड संचलित महिला महाविद्यालय (कराड), शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर), भारतीय शिक्षण संस्था (पुणे) आणि जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित (कराड) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवा आणि सहकार’ या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र सौ. वेणूताई चव्हाण स्मारक सांस्कृतिक सभागृह येथे पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत बल्लाळ यांनी प्रास्ताविक करताना सहकार क्षेत्रात तरुणांच्या सहभागाचे महत्त्व स्पष्ट केले. याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू प्रो. (डॉ.) ज्योती जाधव व उपस्थितांच्या हस्ते 'Abstracts Book' चे प्रकाशन करण्यात आले.
या चर्चासत्रात विविध विषयांवर तीन मार्गदर्शक सत्रे आयोजित करण्यात आली होती:
पहिले सत्र (युवक, बँकिंग वित्तपुरवठा आणि सहकार)- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक श्री. सतीश मराठे यांनी डिजिटल बँकिंग, क्यूआर कोड, मायक्रोफायनान्स व CGTMSE योजनेची माहिती देत युवकांनी नेतृत्व आणि व्यवस्थापन कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले.
दुसरे सत्र (सहकार क्षेत्रात महिला सक्षमीकरण)- माणदेशी बँकेच्या संस्थापक श्रीमती चेतना सिन्हा यांनी धैर्याला भांडवल मानून काम करण्याचा संदेश दिला, तसेच मोबाईल बँकिंग व 'बिजनेस स्कूल ऑन व्हील्स' या उपक्रमांची माहिती दिली.
तिसरे सत्र (युवक आणि सहकार) - आभासी माध्यमातून संवाद साधताना श्री. बी. डी. पवार यांनी युवकांनी कौशल्य आधारित शिक्षण आणि नवप्रवर्तनाला प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली.
या प्रसंगी श्री. सतीश मराठे, प्रो. (डॉ.) ज्योती जाधव, श्रीमती चेतना सिन्हा, प्राचार्य डॉ. उदयकुमार शिंदे, श्री. बाळासाहेब कुलकर्णी, श्री. चंद्रशेखर देशपांडे यांसह ऍड. अरविंद घाटे, श्री. जनार्दन शिंदे, श्री. अमित कुलकर्णी, सी.ए. शिरीष गोडबोले, प्रा. (डॉ.) गिरीश पठाडे व श्री. राजेंद्र लाटकर यांचा सत्कार करण्यात आला. श्री. चंद्रशेखर देशपांडे यांनी मनोगतात तरुण पिढीला सहकार चळवळीत सक्रिय होण्याचे आवाहन केले.
सत्रात आयोजित स्पर्धेतील तीन विजेत्यांचा तसेच परीक्षक डॉ. अपर्णा पठाडे, डॉ. एन. ए. पाटील व डॉ. सुवर्णा कुरकुटे यांचा सन्मान करण्यात आला. यशस्वी आयोजनाबद्दल संयोजक सचिव डॉ. अखिलेश शिंदे व डॉ. विलास सुर्वे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विलास सुर्वे, प्रा. स्वप्ना केतकर व प्रा. रेखा धुळप यांनी केले. सी.ए. शिरीष गोडबोले आणि डॉ. अखिलेश शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. शिक्षण संस्था व पतसंस्थेचे पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनायक फडके आणि प्रत्यक्ष व ऑनलाइन उपस्थित प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे हे चर्चासत्र यशस्वी ठरले.
-----------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



























