एस. के. एन. सिंहगड कोर्टी - पंढरपूर येथे प्रिपरेशन ऑफ कॉम्पिटिटिव्ह एक्झाम कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न

सहाय्यक पोलीस अधीक्षक (IPS) प्रशांत डगळे व पीएसआय सुप्रिया यादव यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

Competitive Exam Preparation Program, Solapur, Pandharpur, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर प्रतिनिधी 

पंढरपूर प्रतिनिधी : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी,पंढरपूर येथील कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सेलच्या वतीने ‘प्रिपरेशन ऑफ कॉम्पिटिटिव्ह एक्झाम’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश  करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार, दि. १२ ऑगस्ट रोजी  महाविद्यालयाच्या ए.सी. सेमिनार हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कैलाश करांडे यांनी दिली. 

या कार्यक्रमासाठी  सहाय्यक पोलीस अधीक्षक (IPS) श्री. प्रशांत डगळे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. तसेच पोलीस उपनिरीक्षक श्रीमती सुप्रिया यादव यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीबाबत मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना योग्य नियोजन, सातत्य, अभ्यासाची दिशा आणि परीक्षेतील आव्हानांना सामोरे जाण्याच्या विविध बाबींवर मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी प्रेरणा मिळाली.

यावेळी श्री. प्रशांत डगळे यांचा सत्कार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच पोलीस उपनिरीक्षक श्रीमती सुप्रिया यादव यांचा सत्कार डॉ अंजली पिसे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु. तनिष्का जाधव व कु. पायल लोखंडे यांनी केले.

कार्यक्रमाचे नियोजन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सेलचे इन्चार्ज प्रा. ओंकार बिडकर यांनी केले. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सेलचे अध्यक्ष कु. प्रणव वनवे, उपाध्यक्ष कु अक्षय पाटील ,  कु सचिव शेखर रणखांबे व उपसचिवा कु. तनिष्का जाधव, कु. रोहित आसबे व कु. शुभम साळुंखे ,कु.मयूर गोसावी यांनी मोलाचे सहकार्य केले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, अभ्यासाचे योग्य नियोजन कसे करावे आणि स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी कोणत्या बाबींवर भर द्यावा, याबाबत उपयुक्त मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

       -----------------

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !