जनजागृतीशिवाय स्वच्छता अशक्य - नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई - आरोग्य सभापती केतकी पाटणे-मोरे

साथीच्या रोगांचा धोका लक्षात घेता नगरपरिषदेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना

Cleanliness is impossible without public awareness, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, वाई प्रतिनिधी शुभम कोदे 

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणाऱ्या, कचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापन करणाऱ्या आणि आरोग्याचे नियम पायदळी तुडवणाऱ्या वर आता थेट दंडात्मक कारवाई केली जाईल, असे आरोग्य सभापती केतकी पाटणे- मोरे यांनी सांगितले.

 वाई शहरात पावसाळ्यात साथीच्या रोगांचा धोका लक्षात घेता नगरपरिषद प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून, केवळ पालिकेवर टीका करण्याऐवजी नागरिकांनीही स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारावी, असे मत नगरसेविका तथा आरोग्य सभापती केतकी पाटणे-मोरे यांनी व्यक्त केले.

     अलीकडे शहरातील कचरा, साचलेले पाणी आणि अस्वच्छतेबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर प्रशासनावर टीका होत असली, तरी शहरातील अनेक ठिकाणी काही नागरिकांकडूनच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, नाल्यांमध्ये प्लास्टिक व घनकचरा फेकणे आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याने परिस्थिती गंभीर होत असल्याचे त्यांनी सांगितले.

     "फक्त नगरपरिषदेवर बोट दाखवून प्रश्न सुटणार नाही. प्रत्येक नागरिकाने स्वतःची जबाबदारी ओळखून कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. वारंवार सूचना देऊनही नियमांचे पालन न करणाऱ्यांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाईल. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना आढळणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल," असे केतकी पाटणे-मोरे यांनी स्पष्ट केले.

     त्यांनी पुढे सांगितले की, पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या साथीच्या रोगांचा धोका वाढत असल्याने नगरपरिषदेमार्फत आवश्यक त्या भागात औषध फवारणी, डी.डी.टी. पावडरची फवारणी, धूर फवारणी तसेच नाल्यांची नियमित स्वच्छता करण्यात येणार आहे. नागरिकांनी घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नये आणि स्वच्छतेसाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

     नगरपरिषदेच्या मते, स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून नागरिकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे शहरात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असून, नियमांचे पालन करणाऱ्या नागरिकांच्या सहकार्यानेच वाई शहर रोगमुक्त आणि स्वच्छ ठेवणे शक्य होईल.

"आम्ही शहराला सुंदर आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी कटिबद्ध आहोत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि आपल्या परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी घ्यावी," असे आवाहन  आरोग्य सभापती केतकी पाटणे -मोरे यांनी केले.

       -----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

-----------------

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !