कन्नड–सोयगावच्या शिक्षण प्रश्नांसाठी आमदार संजनाताई जाधव यांचा पुढाकार

शिक्षणमंत्र्यांकडे आदित्यवर्धन जाधव यांच्यामार्फत निवेदन

Problem of education system, education minister Pankaj Bhoir, MLA Sanjana Jadhav, kannad, Chhatrapati Sambhaji Nagar , shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, कन्नड (प्रतिनिधी मनोज चव्हाण)

कन्नड–सोयगाव विधानसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लागावेत, यासाठी आमदार संजनाताई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्यवर्धन जाधव यांनी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री मा. पंकज भोयर यांची भेट घेऊन विविध महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

निवेदनामध्ये मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची रिक्त पदे असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याची बाब अधोरेखित करण्यात आली आहे. अनेक शाळांमध्ये विषयनिहाय शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असून त्यांचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे रिक्त शिक्षक पदे तातडीने भरून प्रत्येक शाळेत आवश्यक शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली.

यासोबतच आधार कार्ड, जन्मनोंदणी आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींमुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती, शासकीय योजना, परीक्षा अर्ज तसेच विविध शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहत असल्याकडेही शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांच्या पूर्ततेतील विलंबामुळे विद्यार्थी व पालकांना वारंवार शासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कन्नड–सोयगाव मतदारसंघात विशेष आधार नोंदणी, जन्मनोंदणी व कागदपत्र पडताळणी शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, तसेच शिक्षण विभाग, स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधून विद्यार्थ्यांची प्रकरणे प्राधान्याने निकाली काढावीत, अशी मागणीही करण्यात आली.

यावेळी शिक्षणमंत्री मा. पंकज भोयर यांच्याकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आवश्यक त्या तातडीच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देऊन प्रभावी कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली.

याप्रसंगी आमदार संजनाताई जाधव यांनी, "शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार असून कन्नड–सोयगाव मतदारसंघातील एकाही विद्यार्थ्याला कोणत्याही कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये. मतदारसंघातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण आणि शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल," अशी ठाम भूमिका व्यक्त केली.

        -----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

-----------------

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !