भाजी मंडईतील झाडांच्या फांद्यांवरून वाई नगरपरिषदेत खडाजंगी

अजित शिंदेंचा विकासकामांवर सवाल; “नागरिकांच्या हितासाठी की स्वार्थासाठी?” — सभेत आरोप-प्रत्यारोप

Ajit Shinde questions development works, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई नगरपरिषदेच्या विशेष सभेत भाजी मंडई परिसरातील सुशोभीकरणाच्या कामादरम्यान झाडांच्या फांद्या तोडण्याच्या मुद्द्यावरून जोरदार चर्चा रंगली. नगरपरिषद सदस्य अजित शिंदे यांनी झाडे तोडण्यास विरोध करत, ज्या झाडांच्या फांद्यांमुळे नागरिकांना किंवा परिसराला धोका निर्माण होतो, त्याच फांद्यांची आवश्यकतेनुसार छाटणी करण्यात यावी, अशी भूमिका मांडली.

भाजी मंडईच्या सुशोभीकरणाच्या कामाच्या पार्श्वभूमीवर झाडांच्या फांद्या काढण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करत शिंदे यांनी पर्यावरणाच्या दृष्टीने झाडांचे संरक्षण आवश्यक असल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्या या भूमिकेला प्रसाद बनकर, केतकी मोरे व जागृती पोरे यांनी विरोध करत हा मुद्दा खोडून काढला.

दरम्यान, नगराध्यक्ष अनिल सावंत आणि विरोधी पक्षनेते विजय ढेकाणे यांनी भाजी मंडईतील सुमारे १२५ भाजी विक्रेत्यांपैकी एकाही विक्रेत्याने झाडांच्या फांद्यांबाबत तक्रार केलेली नाही, असे सभेत स्पष्ट केले. उलट मंडईतील भाजी व्यावसायिक स्वतःहून झाडांच्या फांद्या तोडण्याची मागणी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

 यावर अजित शिंदे यांनी आक्षेप घेत, विकासकामांच्या नावाखाली झाडांची अनावश्यक कत्तल होऊ नये, अशी भूमिका मांडली. “होणारा विकास नागरिकांच्या हितासाठी नसून स्वतःच्या फायद्यासाठी केला जात आहे,” असा आरोपही शिंदे यांनी सभेत केला. त्यामुळे भाजी मंडईतील सुशोभीकरणाच्या कामावरून नगरपरिषदेत आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले.

 विशेष सभेतील चर्चेत भाजी मंडई सुशोभीकरणासह घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ भारत अभियान, नदी संवर्धन, रस्ते व विद्युत वाहिन्यांसह विविध विकासकामांबाबतही चर्चा झाली. शहराच्या विकासासोबत पर्यावरणाचे संरक्षण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा समतोल राखण्याची गरज असल्याचे या चर्चेतून पुढे आले.

 झाडांच्या फांद्यांची छाटणी नेमकी कोणत्या निकषांवर करण्यात आली, संबंधित झाडांना धोका निर्माण झाला होता का आणि मंडईतील व्यावसायिकांची मागणी अधिकृतपणे नोंदविण्यात आली आहे का, याबाबत आता नागरिकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.

     -----------------

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !