आषाढी वारीसाठी माळशिरस प्रशासन सज्ज

लाखो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी

Administration get ready, welcome to warkari, ashadhi ekadashi vari, pandharpur, malshiras, Solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, माळशिरस - प्रतिनिधी वैभव कुलकर्णी

आषाढी वारीच्या पवित्र सोहळ्यासाठी माळशिरस तालुका पूर्णपणे सज्ज झाला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे भव्य स्वागत करण्यासाठी संपूर्ण प्रशासन यंत्रणा कामाला लागली आहे. लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी ग्रामपंचायत, नगरपरिषद, पंचायत समितीसह विविध शासकीय विभागांनी कंबर कसली आहे.

​संत ज्ञानेश्वर महाराज पालखी: १९ जुलै रोजी धर्मपुरी येथे आगमन. त्यानंतर धर्मपुरी, कारूंडे, मोरोची, मांडवे, सदाशिवनगर, पुरंदावडे, येळीव, पाणीपाटी, खुडूस, विझोरी, पिसेवाडी, वेळापूर, ठाकुरबुवा, उघडेवाडी आणि तोंडले मार्गे प्रवास. २१ जुलै रोजी वेळापूर येथे मुक्काम, तर २२ जुलै रोजी तांबवे, लवंग, बोरगाव आणि माळखांबी-बोंडले मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान.

​संत तुकाराम महाराज पालखी: २० जुलै रोजी तालुक्यात प्रवेश आणि अकलूज येथे मुक्काम. यानंतर यशवंतनगर, संग्रामनगर, माळशिरस आणि सवतगव्हाण मार्गे पालखी मार्गक्रमण करेल.

वारकऱ्यांसाठी सुविधांचा महापूर

​वारकऱ्यांना कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावे लागू नये, यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध पावले उचलली आहेत:

​स्वच्छता व आरोग्य: पालखी मार्गाची स्वच्छता, गटारांची साफसफाई, तसेच जंतुनाशक फवारणी केली जात आहे. ठिकठिकाणी आरोग्य तपासणी केंद्रे उभारली जाणार आहेत.

​विशेष कक्ष: मुक्कामाच्या ठिकाणी स्वागत कमान, वारकरी सुविधा केंद्र, हिरकणी कक्ष, मसाज सेंटर आणि ओसी (OC) केंद्रे स्थापन केली जातील.

​मूलभूत गरजा: वारकऱ्यांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी, प्रभावी पथदिवे आणि रस्ते दुरुस्तीच्या कामांना वेग आला आहे.

​"दोन प्रमुख पालख्यांसह अनेक लहान-मोठ्या पालख्यांसोबत लाखो भाविक या सोहळ्यात सहभागी होतात. त्यामुळे वारकऱ्यांना मूलभूत सुविधांसह जास्तीत जास्त चांगल्या सोयी कशा मिळतील, या दृष्टीने प्रशासनाने वेळोवेळी बैठका घेऊन संपूर्ण तयारी केली आहे."

रघुनाथ पांढरे, 

गटविकास अधिकारी, माळशिरस 

​सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर पालख्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थ आतुर आहेत. भाविकांच्या भक्तीमय प्रवासासाठी माळशिरस प्रशासन 'वारीसाठी पूर्ण तयारी करून सज्ज झाले आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !