हाफकिनच्या पुनरुज्जीवनाची धुरा आता डॅशिंग तुकाराम मुंढेंच्या खांद्यावर

नरहरी झिरवाळ यांची मोठी घोषणा

Tukaram Mundhe, Mumbai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, मुंबई

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागात आपल्या धडाकेबाज कारवायांनी अवैध भेसळखोर आणि गुन्हेगारांचे धाबे दणाणून सोडणाऱ्या आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर आता एका अत्यंत महत्त्वाच्या संस्थेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या मुंबईतील ऐतिहासिक आणि प्रतिष्ठेच्या 'हाफकिन बायो फार्म' या संस्थेला पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य सरकारने तुकाराम मुंढे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

विधानसभेत मंत्री नरहरी झिरवाळ यांची घोषणा

शुक्रवारी (ता. 3 जुलै) विधानसभेच्या सभागृहात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. मुंबईतील हाफकिन बायो फार्म या संस्थेच्या आर्थिक दुरावस्थेबाबत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. या चर्चेला उत्तर देताना मंत्री झिरवाळ यांनी तुकाराम मुंढे यांच्याकडे ही अतिरिक्त जबाबदारी सोपवल्याचे जाहीर केले.

संस्थेच्या खासगीकरणाच्या शक्यतेवर पूर्णविराम

हाफकिन संस्थेच्या जागेची विक्री केली जाणार आहे किंवा संस्थेचे खासगीकरण होणार आहे, असे आरोप विरोधकांनी केले होते. मात्र, मंत्री नरहरी झिरवाळ यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "हाफकिन संस्थेची जागा विक्री केलेली नाही आणि या संस्थेचे खासगीकरणही केले जाणार नाही," अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी सभागृहात दिली. तसेच, या संस्थेच्या संदर्भात नेमण्यात आलेल्या डॉ. रघुनाथ माशेलकर समितीचा अहवाल लवकरच सभागृहात सादर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदारांनी मांडली होती व्यथा

मुंबईतील हाफकिन बायो फार्म या संस्थेच्या आर्थिक परिस्थितीबद्दल आमदार ज्योती गायकवाड, विजय वडेट्टीवार, अमिन पटेल, योगेश सागर, अजय चौधरी, रईस शेख, अस्लम शेख, विश्वजीत कदम, विकास ठाकरे, प्रशांत ठाकूर, सुनील राऊत आणि अतुल भातखळकर यांनी सभागृहात आवाज उठवला होता. लसींच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या संस्थेचे महत्त्व ओळखून आमदारांनी सरकारला ठोस पावले उचलण्याची मागणी केली होती.

मुंढेंच्या कार्यशैलीकडून अपेक्षा

अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोर,  विक्रेत्यांविरोधात सुरू केलेल्या आक्रमक कारवाईमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता त्यांच्याकडे हाफकिनची धुरा सोपवल्यामुळे, ही संस्था पुन्हा एकदा आर्थिक संकटातून बाहेर पडून सक्षम होईल, अशी मोठी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !