मा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते होणार शुभारंभ
शिवशाही वृत्तसेवा,सदाशिवनगर (प्रतिनिधी वैभव कुलकर्णी)
श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि., सदाशिवनगर आणि श्री शंकर सहकारी साखर कारखाना सेवक कल्याणकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सदाशिवनगर येथे नवीन 'श्री हनुमान मंदिर' उभारण्यात येणार आहे. या मंदिर बांधकामाचा भूमीपूजन सोहळा येत्या सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता संपन्न होणार आहे.
या मंगलमय सोहळ्याचे भूमीपूजन महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी मा. सौ. नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमास परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, अशी विनंती कारखान्याचे चेअरमन मा. आ. श्री. रणजितसिंह मोहिते-पाटील, व्हाईस चेअरमन मा. श्री. ॲड. मिलिंद कुलकर्णी, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मा. श्री. स्वरूप देशमुख, कार्यकारी संचालक मा. श्री. अभिजित दुबल,जनरल मॅनेजर रविराज जगताप,मुख्य शेतकीअधिकारी आनंदराव गायकवाड, चिफ इंजिनियर समाधान कागदे, सिव्हील इंजिनिअर राहुल मगर, सुरक्षा अधिकारी ज्ञानदेव पवार आणि सर्व संचालक मंडळ, सभासद, अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या वतीने करण्यात आली आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



