कर्मयोगी इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम वर्ष बी.टेक. प्रवेश 'सुविधा केंद्राचे' उत्साहात उद्घाटन

विद्यार्थ्यांनी मोफत मार्गदर्शन व अचूक नोंदणी सुविधेचा लाभ घेण्याचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील यांचे आवाहन

Inauguration of the B.Tech. Facilitation Centre, Solapur, Pandharpur, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर प्रतिनिधी 

येथील श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता बी.टेक. प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी प्रवेशासाठी शासनमान्य 'सुविधा केंद्र' (फॅसिलिटेशन सेंटर) सुरू करण्यात आले आहे. "अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया क्लिष्ट आणि केंद्रीभूत असल्याने विद्यार्थ्यांनी या सुविधा केंद्रातून तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे आणि अचूकपणे आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून आपला प्रवेश निश्चित करावा," असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील यांनी केले. महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सुविधा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

प्राचार्य डॉ. पाटील पुढे म्हणाले की, अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत (CAP) पद्धतीने होत असल्याने विद्यार्थ्यांना ठराविक मुदतीतच सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागते. घाईगडबडीत किंवा अपुऱ्या माहितीमुळे विद्यार्थ्यांकडून चुका होऊन त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असते. हीच अडचण ओळखून कर्मयोगी इन्स्टिट्यूटला मिळालेल्या या शासनमान्य केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योग्य दिशा दिली जाईल.

ऑनलाइन रजिस्ट्रेशन व कागदपत्रांचे मार्गदर्शन मोफत

या प्रसंगी माहिती देताना महाविद्यालयाचे प्रवेश प्रक्रिया प्रमुख प्रा. डॉ. अभय उत्पात यांनी सांगितले की, "प्रवेश प्रक्रियेची सुरुवात करण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे लागते. यासाठी महाविद्यालयात संपूर्णपणे मोफत सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मार्गदर्शन केंद्रामध्ये केवळ फॉर्म भरणेच नव्हे, तर प्रवेशासाठी आवश्यक असणारी महत्त्वाची कागदपत्रे, विविध स्कॉलरशिप्स (शिष्यवृत्ती) आणि ईबीसी (EBC) सवलत यासंबंधीची सविस्तर व मोफत माहिती दिली जाईल."

प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी व अचूक नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया प्रमुख प्रा. डॉ. अभय उत्पात (९१५८३२५०५५)व प्रा. ए. टी. बाबर (९४२३५२६७५५) यांच्याशी थेट संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

विविध मान्यवरांची उपस्थिती

या सुविधा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. कणसे, रजीस्ट्रार जी. डी. वाळके, उप-प्राचार्य प्रा. जे. एल. मुडेगावकर, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. राहुल पांचाळ, विविध विभागांचे प्रमुख डॉ. एस. एम. लंबे, डॉ. एस. व्ही. एकलारकर, डॉ. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !