वटपौर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर पिंपळाला नवजीवन - खानापूरच्या युवकांच्या प्रयत्नांना सलाम

संस्कृतीचा आणि पर्यावरणाचा वारसा जपण्याचा प्रेरणादायी आदर्श

Saving the life of a Peepal tree on the auspicious occasion of Vat Purnima, Wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे) 

वाई खानापूर  विकासाच्या नावाखाली अनेकदा निसर्गाची हानी होत असताना खानापूर गावाने मात्र आपल्या संस्कृतीचा आणि पर्यावरणाचा वारसा जपण्याचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला आहे. गावातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या पवित्र पिंपळ वृक्षाला नवजीवन देत वटपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर त्याचे पुन्हा त्याच ठिकाणी गावाच्या पारावरती  रोपण करण्यात आले. गावातील या पिंपळ वृक्षावर यापूर्वी अनेकदा कुऱ्हाडीचे घाव बसले. फांद्या छाटण्यात आल्या, तरीही "मी पुन्हा येईन" या जिद्दीने त्याने नव्या पालवीने पुन्हा बहर धरला. मात्र काही समाजकंटकांनी या वृक्षावर ॲसिड टाकून त्याचे मोठे नुकसान केले. तरीही निसर्गापुढे विनाशाचा टिकाव लागत नाही, हेच या वृक्षाने पुन्हा सिद्ध करून दाखवले.

खानापूर गावातील युवक, ग्रामस्थ आणि सहकारी मित्रांनी एकत्र येत अथक प्रयत्न केले आणि वटपौर्णिमेच्या शुभदिनी पिंपळाचे पुनर्रोपण करून या वृक्षाला नवजीवन दिले. या उपक्रमामुळे गावकऱ्यांनी पर्यावरण संवर्धनाबरोबरच आपल्या संस्कृतीचे जतन करण्याची जबाबदारीही कृतीतून दाखवून दिली.

पिंपळ हा केवळ एक वृक्ष नसून आपल्या गावाची ओळख, पूर्वजांच्या आठवणी, श्रद्धा आणि संस्कृतीचा जिवंत साक्षीदार आहे. पौराणिक ग्रंथ, धर्मशास्त्र आणि आयुर्वेदामध्ये पिंपळाला अत्यंत महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा वृक्ष अनमोल मानला जातो. म्हणूनच पिंपळ म्हणजे श्वास आणि श्वास म्हणजे जीवन, अशी भावना भारतीय संस्कृतीत व्यक्त केली जाते. गेल्या वर्षीही खानापूर गावाने वड, पिंपळ, लिंब, अर्जुन, मोह आणि जांभूळ यांसारख्या पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड खानापूर हायस्कूल परिसरात करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला होता. गावात अशा अनेक उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी होत असून त्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

या पुनर्रोपणानिमित्त ग्रामस्थांनी एकच भावनिक आवाहन केले आहे या पवित्र पिंपळाला आता कोणतीही इजा होऊ देऊ नका. हा वृक्ष जपला, तर तोच आपल्या पुढील पिढ्यांचा श्वास जपेल." आपली संस्कृती... आपला निसर्ग... आणि आपला श्वास तो जपणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. खानापूरच्या युवकांनी ती जबाबदारी कृतीतून सिद्ध केली आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !