अन्न व औषध प्रशासनाचा धडक छापा - विनाचाचणी दूधपुरवठ्याचा धक्कादायक प्रकार उघड

वाईत परवान्याशिवाय दूध वाहतूक करणाऱ्या ६ वाहनांची तपासणी - बारा नमुने तपासणीसाठी जमा

Action taken by the Food and Drug Administration, milk, Wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे) 

वाई तालुक्यातील धोम धरण परिसरात अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या धडक छाप्यात परवान्याशिवाय दूध संकलन व वाहतूक करणाऱ्या तब्बल सहा वाहनांवर कारवाई करण्यात आली. व बारा दुधाचे नमुने तपासणी करता अन्न औषध प्रशासनाने नेहले  आहेत  या कारवाईमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, दूध व्यवसायातील बेकायदेशीर व्यवहारांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कारवाईदरम्यान धक्कादायक बाब समोर आली की, पकडण्यात आलेल्या वाहनचालकांकडे दूध संकलन किंवा वाहतुकीसाठी आवश्यक असलेला कोणताही वैध परवाना नव्हता. याशिवाय, संकलित केलेल्या दुधाची गुणवत्ता अथवा भेसळ तपासणी न करताच ते विविध डेअरींकडे पाठविले जात असल्याचेही प्राथमिक चौकशीत निदर्शनास आले आहे. ओंकार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या डेऱ्यांमध्ये हे दूध घालत होते त्या डेऱ्यांवर पण कारवाई होणार असल्याचे ओंकार शिंदे यांनी सांगितले  सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या दुधाची कोणतीही प्रयोगशाळा चाचणी न करता त्याचा पुरवठा होत असेल, तर हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अशा विनाचाचणीच्या व विनापरवाण्याच्या दूध वाहतूक करण्यामुळे व  दुधामुळे भविष्यात कोणत्याही नागरिकाच्या आरोग्याला धोका निर्माण झाला, तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची? असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे. कारवाईत काय आढळले?

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने विविध वाहनांमधून मोठ्या प्रमाणात दूध तपासणीसाठी सहा गाड्यांमधील प्रत्येकी दोन दोन असे  12 नमुने  तपासणीसाठी पाठवले आहेत  नामदेव महादेव नवघने (रा. वासोळे) यांच्या वाहनातून २६५ लिटर (६५ लिटर गायीचे, २०० लिटर म्हशीचे) दूध जप्त करण्यात आले. हे दूध नियती डेअरी, वाई येथे नेले जात होते. आत्माराम शिवाजी चिकणे (रा. वडवली) यांच्या वाहनातून ३०० लिटर (१२० लिटर गायीचे, १८० लिटर म्हशीचे) दूध आढळले. हे दूध श्रीकृष्ण डेअरी, वाई येथे जाणार होते. प्रकाश तुकाराम गावडे (रा. वाई) यांच्या वाहनातून २६० लिटर (१५० लिटर गायीचे, ११० लिटर म्हशीचे) दूध मिळाले. हे दूध खामकर डेअरी, वाई येथे जमा होणार होते. अजित दत्तात्रय चोरट (रा. कोंढवळी) यांच्या वाहनातून तब्बल ४४० लिटर (१२० लिटर गायीचे, ३२० लिटर म्हशीचे) दूध जप्त करण्यात आले. हे दूध भैरवनाथ दूध, पसरणी येथे जाणार होते. ओंकार शिवाजी सणस( वेलंग )यांच्या वाहनातून १६० लिटर (६० लिटर गायीचे, १०० लिटर म्हशीचे) दूध आढळले. हे दूध श्रीकृष्ण डेअरी, वाई येथे पोहोचविले जाणार होते.प्रदीप प्रकाश जाधव (रा. वेलंग) यांच्या वाहनातून २२० लिटर (१६० लिटर गायीचे, ६० लिटर म्हशीचे) दूध आढळले. हे दूध खामकर दूध डेअरी, वाई येथे जात असल्याचे सांगण्यात आले.

'लहानांवर कारवाई, मोठ्यांना अभय?' काही दिवसांपूर्वी वाई शहरातील पानटपऱ्यांवर कारवाई करून प्रशासनाने मोठी मोहीम राबवल्याचा दावा केला होता. मात्र, नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या दूध व्यवसायातील बेकायदेशीर प्रकारांवर आतापर्यंत प्रभावी कारवाई का झाली नाही, असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात होता. अखेर या धडक मोहिमेत सहा वाहने पकडली गेली असली, तरी या साखळीतील इतर संबंधित घटकांचीही चौकशी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी  ए. ए. गायकवाड, प्रियांका वाईकर, रुपाली खापणे आणि ओंकार शिंदे यांच्या पथकाने केली.

डेअरींचीही चौकशी करण्याची मागणी

केवळ वाहनचालकांवर कारवाई करून प्रकरण संपवू नये, तर विनापरवाना आणि विनाचाचणीचे दूध स्वीकारल्याचा संशय असलेल्या संबंधित डेअरींचीही सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. चौकशीत नियमभंग किंवा अन्य कायदेशीर उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.

वाई तालुक्यातील या कारवाईमुळे दूध व्यवसायातील नियमपालन, अन्नसुरक्षा आणि ग्राहकांच्या आरोग्याच्या संरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, पुढील तपासातून आणखी कोणते धक्कादायक तपशील समोर येतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !