१३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (प्रतिनिधी वैभव कुलकर्णी)
सोलापूर ग्रामीण पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव आणि विनंतीनुसार मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील एकूण १३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित केले आहेत.
ज्या अधिकाऱ्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, जे पदोन्नतीने हजर झाले आहेत किंवा ज्यांनी विनंती बदली मागितली होती, अशा पोलीस निरीक्षकांचा आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा या बदल्यांमध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे, सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक यांनी मंगळवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
कोणाची कोठे बदली?
या प्रशासकीय बदल्यांनुसार अधिकाऱ्यांची नवीन नियुक्ती पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे:
अविनाश पवार: नियंत्रण कक्ष ते अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे.
कुंदन गावडे: वैराग ते सोलापूर तालुका पोलीस ठाणे.
दिपक पाटील: नियंत्रण कक्ष ते मोहोळ पोलीस ठाणे.
बाळू भरणे: वाहतूक शाखा ते टेंभुर्णी पोलीस ठाणे.
अमुल कादबने: नियंत्रण कक्ष ते वैराग पोलीस ठाणे.
दशरथ वाघमोडे: पंढरपूर शहर पोलीस ठाणे ते माळशिरस पोलीस ठाणे.
तय्यब मुजावर: पंढरपूर तालुका पोलीस ठाणे ते पंढरपूर शहर पोलीस ठाणे.
सुरेश चिल्लावार: अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे ते पंढरपूर तालुका पोलीस ठाणे.
विकास दिंडुरे: माळशिरस पोलीस ठाणे ते सायबर पोलीस ठाणे.
दिपक बरडे: नियंत्रण कक्ष ते जिल्हा वाहतूक शाखा.
कमलाकर गहीमे: नियंत्रण कक्ष ते आर्थिक गुन्हे शाखा.
अक्षय सोनवणे (सपोनि): पंढरपूर तालुका पोलीस ठाणे ते बार्शी तालुका पोलीस ठाणे (प्रभारी).
गणेश कड (सपोनि): आर्थिक गुन्हे शाखा ते सोलापूर तालुका पोलीस ठाणे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



