अजनुज व धावडवाडी येथे ट्रान्सफार्मर फोडून ४० हजार रुपयांच्या तांब्यांच्या तारांची चोरी

खंडाळा तालुक्यात जॅक्सन कंपनीचे दोन ट्रान्सफार्मर तोडून तांब्याची तार लांबवली; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Theft of copper wires, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार जॅक्सन लिमिटेड कंपनीतर्फे सातारा सर्कलमध्ये नवीन ट्रान्सफार्मर बसविण्याचे व महावितरणला हस्तांतरित करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, खंडाळा तालुक्यातील अजनुज हद्दीतील ट्रान्सफार्मर आणि धावडवाडी (यादव वस्ती) येथील ट्रान्सफार्मर हे दोन्ही ट्रान्सफार्मर अज्ञात चोरट्यांनी खाली पाडून तोडले. 

चोरट्यांनी ट्रान्सफार्मरमधील सुमारे ४० हजार रुपये किमतीची ११ किलो तांब्याची तार तसेच ट्रान्सफार्मरमधील १० हजार रुपयांचे ऑईल बाहेर सांडवून नुकसान करत तांब्याची तार चोरून नेली. या प्रकरणी अवधेशकुमार इंद्रमोहन चौधरी (रा. बारामती, मूळ रा. मधबुनी, बिहार) यांनी दिलेल्या तक्रारीवरून खंडाळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, अधिक तपास पोलीस हवालदार चंद्रकांत ढापटे करीत आहेत.

      ---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !