स्वातंत्र्य सैनिक रायकुमार गुजर बी प्रशालेत दिंडी सोहळ्यात बावीस दिंड्यांचा सहभाग

टाळ, मृदुंग आणि हरिनामाच्या गजरात विद्यार्थी भजनात रंगून गेले.

Dindi procession, pune, shirur, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,शिरूर (प्रतिनीधी फैजल पठाण)

तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत संस्थेचे संचालक व विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखी आषाढी एकादशी वारीनिमित्ताने दिंडी सोहळा संपन्न झाला.

  अध्यात्म आणि संस्कृती यांचा मेळ घालत संपूर्ण गावातून हरिनामाच्या गजरात भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळा पार पडला. सुरवातीला प्रशालेत पालखीचे पूजन मुख्याध्यापक अशोक दहिफळे, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे यांच्या हस्ते करण्यात आले. विविध विद्यार्थ्यांनी संतांच्या वेशभूषा केल्या होत्या. अनेक विध्यार्थी आणि विद्यार्थिनी वारकऱ्यांच्या वेशात आले होते.

 टाळ, मृदुंग आणि हरिनामाच्या गजरात विद्यार्थी भजनात रंगून गेले.

प्रशालेच्या प्रांगणात अश्व रिंगण सोहळा पार पडला.

विद्यार्थिनीनी फुगडी खेळून सोहळ्याचा आनंद घेतला.

आषाढी वारीत ज्याप्रमाणे क्रमाने आणि शिस्तीने दिंडी सोहळा पार पडतो त्याप्रमाणे संपूर्ण गावातून दिंडी क्रमांकानुसार दिंडी सोहळा पार पडला. गावातील लोकांनी मोठ्या उत्साहात दिंडी सोहळ्याचे स्वागत केले. दिंडी हा एक प्रबोधनाचा मार्ग असल्याने मुलांनी अनेक सामाजिक विषयावर चिंतन आणि मनन करायला लावणारे सुविचाराचे फलक दिंडीत हातात घेऊन प्रबोधन केले.

दिंडीच्या निमित्ताने महिला सुरक्षाविषयक एक प्रबोधनात्मक छान नाटिका सादर केली. ग्रामस्थांनी या नाटिकेला छान प्रतिसाद दिला.

बाजार मैदान या ठिकाणी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अरविंद ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, संचालक परेश सातपुते,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शिरूर तालुक्याचे अध्यक्ष नवनाथ कांबळे, ह. भ. प. सूर्यकांत महाराज जगताप, तळेगावचे माजी उपसरपंच मनोज आल्हाट, माऊली आल्हाट,सचिन पंडित, श्रीपती भुजबळ, विजय कुंभार,यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.

मनोज आल्हाट आणि आरंभ प्रॉपर्टीचे संचालक नवनाथ भुजबळ यांच्या वतीने मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

या सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, सचिव अरविंद ढमढेरे, जेष्ठ संचालक विजय ढमढेरे ,संचालक महेश ढमढेरे यांनी सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या.

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !