ओझर्डे पीएमश्री जिल्हा परिषद शाळेचा राज्यभर डंका

पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत अभूतपूर्व यश संपादन केले

Success in the fifth scholarship exam, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई तालुक्यातील ओझर्डे येथील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने सन २०२५-२६ च्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत अभूतपूर्व यश संपादन करत सातारा जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेला राज्यपातळीवर नवा मान मिळवून दिला आहे. शाळेची विद्यार्थिनी कु. स्वरा आशुतोष गार्डी हिने तब्बल २९२ गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. तर स्वराज श्रीनिवास कुंभार याने २८६ गुणांसह राज्यात चौथा क्रमांक पटकावत शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला.

याशिवाय कु. प्रेरणा दत्तात्रय फरांदे (२५६ गुण), सार्थक संतोष फरांदे (२५० गुण) आणि अंश सचिन फरांदे (२४८ गुण) यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेच्या गुणवत्तेची परंपरा कायम राखली. या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामागे मार्गदर्शक शिक्षिका सविता सचिन क्षीरसागर यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, नियोजनबद्ध अध्यापन आणि अथक परिश्रम मोलाचे ठरले. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करून

त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचविण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याची भावना पालक व ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या दैदिप्यमान यशाबद्दल पंचायत समिती सदस्या हर्षदा फरांदे, गटविकास अधिकारी नारायण घोलप, गटशिक्षणाधिकारी हर्षवर्धन मोरे, शिक्षण विस्तार अधिकारी तथा शाळेचे माजी मुख्याध्यापक दिलीप बाबर, शिक्षण विस्तार अधिकारी साईनाथ वाळेकर, ग्रामविस्तार अधिकारी गायकवाड, केंद्रप्रमुख वेंदे, वारागडे, सौ. भांगरे, ग्रामपंचायत प्रशासक शेखर फरांदे, सदस्य केशव पिसाळ, ग्रामविकास अधिकारी संजय वर्णेकर, गुरव गुरुजी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश पिसाळ, उपाध्यक्ष कोमल जाधव, मुख्याध्यापिका रेखा जमदाडे, माजी मुख्याध्यापिका रोहिणी जमदाडे तसेच सर्व शिक्षकवृंद, पालक आणि ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षिकेचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही जिद्द, परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर राज्यात सर्वोच्च यश संपादन करता येते, याची प्रचीती ओझर्डेच्या पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने पुन्हा एकदा करून दिली आहे. या उल्लेखनीय यशामुळे वाई तालुका आणि सातारा जिल्ह्याच्या शैक्षणिक नावलौकिकात मानाची भर पडली आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !