लहुजी क्रांती सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष गंगाधर कोतेवार यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात घेतला शिवबंध; नायगाव तालुक्यासह नांदेड जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग

Deputy Chief Minister Eknath Shinde, nande, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,नांदेड (प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)

सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे आणि एक धाडसी कार्यकर्ता म्हणून ओळखले जाणारे लहुजी क्रांती सेनेचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष गंगाधर दिगंबरराव कोतेवार (होटाळकर)श यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला आहे. ठाणे येथील स्वर्गीय गंगुबाई शिंदे सभागृहात पार पडलेल्या एका विशेष सोहळ्यात, उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

सामाजिक कार्यातून राजकीय प्रवासाकडे

नायगाव तालुक्यातील मौजे होटाळा येथील रहिवासी असलेले गंगाधर कोतेवार हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. समाजाच्या विविध प्रश्नांवर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आवाज उठवला आहे. भारतीय लहुजी सेनेत पारदर्शक काम केल्यानंतर, सद्यस्थितीत ते लहुजी क्रांती सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून धुरा सांभाळत होते. कोतेवार यांनी आता मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षात प्रवेश करून समाजकार्य करावे, अशी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांची व समाजबांधवांची इच्छा होती. याच भावनेचा आदर करत त्यांनी अखेर शिवसेना पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे.

प्रमुख कार्यकर्त्यांचाही शिवसेनेत प्रवेश

गंगाधर कोतेवार यांच्यासोबतच नांदेड जिल्ह्यातील अनेक प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामध्ये प्रामुख्याने:

 मुकिंदर कुडके (सामाजिक कार्यकर्ते)

शेख इस्माईल कुंचेलीकर

 राजेंद्र अडागळे

 रमेश रोकडे

 बाबुराव आंबेगावकर

या सर्व कार्यकर्त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत केले. गंगाधर कोतेवार यांच्या या धडाकेबाज राजकीय एन्ट्रीमुळे नायगाव तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढणार असून, त्यांच्या या निर्णयाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !